Wednesday, 16 March 2022

 फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी रोहयो आणि फलोत्पादन

विभागाचा घेतला आढावा

हळद संशोधन व प्रक्रिया धोरणाविषयी चर्चा.

            मुंबई, दि. 15 : हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालावर फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्याशी चर्चा करून सविस्तर आढावा घेतला.

            मंत्रालयात रोहयो आणि फलोत्पादन विभागाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, कृषी व फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .

             शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात श्री.भुमरे यांनी समस्या जाणून घेतल्या. श्री.भुमरे म्हणाले, सर्व शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता बँकांशी पत्रव्यवहार करण्यात येईल. यावेळी शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या राज्यस्तरीय समितीने फलोत्पादन मंत्री भुमरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

             हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी संशोधन व प्रक्रिया धोरणावर सविस्तर चर्चा केली.

00000



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi