Tuesday, 15 March 2022

 🪔🪔🪔🪔🪔🏵️🪔🪔🪔🪔🪔

                    *🔸उपदेशामृत.🔸*

*एकदा समर्थ रामदासस्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून "जय जय रघुवीर समर्थ।" असा आवाज दिला.*

*त्या वेळी घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने महाराजांच्या झोळीत भिक्षा घातली आणि म्हणाली,*

*स्त्री : महाराज, काही उपदेश द्या.*

*समर्थ : आज नाही; उद्या देतो.*

*दुसर्‍या दिवशी समर्थांनी पुन्हा त्या घरासमोर उभे राहून आवाज दिला.*

 *त्या दिवशी त्या महिलेने बदाम आणि पिस्ता घालून खीर बनवली होती. ती स्त्री खीरीचा वाडगा घेऊन बाहेर आली.*

 *समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर खीर त्या कमंडलुत ओतण्याआधी तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. त्यामुळे ती खीर घालण्यासाठी थांबली.*

*ती समर्थांना म्हणाली,*

*स्त्री : महाराज, हा कमंडलू तर खराब आहे.*

*समर्थ : खराब तर आहे; पण तू त्यातच खीर घाल.*

*स्त्री : नाही महाराज. मग खीर खराब होईल. तुमचा कमंडलू द्या. तो मी धुऊन स्वच्छ करून देते.*

*समर्थ : म्हणजे हा कमंडलू स्वच्छ झाल्यावरच तू त्यात खीर घालणार ना ?*

*स्त्री : हो महाराज.*

*समर्थ : माझाही हाच उपदेश आहे. मनात जोपर्यंत चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही.*

*"जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल. वाईट संस्कारांचा त्याग करावा लागेल."*

*तेव्हाच खर्‍या सुखाची आणि आनंदाची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल...!!!*

🪔🪔🪔🪔🪔🏵️🪔🪔🪔🪔🪔

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi