Sunday, 26 December 2021

 : हल्ली काय लग्न असो साखरपुडा असो प्रत्येक फंक्शन ला केक कापण्याची फॅशन आहे, तोंडालाफास्तात , अजागळपणा असतो सगळा 

विरोध करेल त्याला ऑर्थोडॉक्स म्हणुन मोकळे होतात

: ह्या अटी घालण्याची वेळ यावी यासारखं महाराष्ट्रीयन दुर्दैव ते दुसरं कोणतं? दक्षिणेकडची लग्न बघा-सजावट नैसर्गिक,स्वागत सरबत-,नैसर्गिक

भोजन-स्थानिक पदार्थ

भपका नाही,दिखावा नाही

म्हणजे मी तरी अशी 5/6,लग्न बघितली आहेत. श्रीमंत घरं पण लग्नविधी महत्वाचे मानून सगळं केलेलं. खूप साजिरे सोहळे होते ते👍👍

: आणि एक मागणी वाढवावी-

रुखवत घरी केलेला असावा,किंवा ठेवूच नये

 दोन दिवसांपूर्वी एक विवाह जमवण्यासाठी उपस्थित होतो. मी मुलाकडील बाजूने होतो. मुलगा माझ्या मित्राचा होता. मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता. पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता. मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या. त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला. 

✅#संपूर्ण विवाह वैदिक पद्धतीनुसार होईल. ✅

1. ✅कोणत्याही प्रकारचे विवाहपूर्व चित्रफीत अथवा छायाचित्रण होणार नाही.✅

2. ✅वधु विवाहप्रसंगी घागरा न घालता महाराष्ट्रिय पद्धतीची साडी नेसेल.✅

3. ✅विवाहस्थळी कसलेही कानठळ्या बसवणारे संगीत न वाजवता शांत संगीत वाजवण्यात येईल. ✅

4. ✅विवाहप्रसंगी म्हणजे हार घालतेवेळी केवळ वधु आणि वर मंचावर असतील ✅

5. हार घालतेवेळी वधु किंवा वरास उचलणार्‍यास विवाहमंडपातून बाहेर घालवण्यात येईल.✅

6. ✅गुरुजींनी विवाहविधी सुरु केल्यानंतर कोणीही त्यांना थांबवणार अथवा अडथळा आणणार नाही. ✅

7.✅ छायाचित्रकार अथवा चित्रफीत तयार करताना गुरुजींना दिशादर्शन करणार नाही. तो लांबूनच चित्रीकरण करेल. ✅

8. छायाचित्रकार वधुवरांना चित्रविचित्र पोजेस देण्यास सांगणार नाही.✅

9. वधुवरांना सर्व आमंत्रितासमोर आलिंगन देण्यास सांगणार्‍यास विवाहमंडपाचे बाहेर काढण्यात येईल. ✅

10. वधु अथवा वराकडील कोणताही पाहुणा दारु अथवा इतर विचित्र भोजनपदार्थ मागणार नाही.

11. कानठळ्या बसवणारे संगीत बिलकुलच लावण्यात येणार नाही.

12. भोजनामध्ये अथवा नाश्त्यामध्ये कोणतेही विचित्र पदार्थ असणार नाहीत. भोजन व नाश्ता पूर्णपणे महाराष्ट्रिय पद्धतीचे व साधे असेल.

13. विवाहप्रसंगी कोणतेही अचकट विचकट नाच होणार नाहीत.

14. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत. 

 आश्चर्य म्हणजे वधुकडील मंडळींनी काही वेळानंतर चर्चा करुन उपरोक्त मागण्या मान्य केल्या आणि विवाह साध्या पद्धतीने करण्य‍ाचे मान्य केले.  

आजच्या काळात असा विवाह प्रस्तावित करणार्‍या या मुलाचे मी ताबडतोब अभिनंदन केले.

 *मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं..*

*झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं..*

*आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं..*

*मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशेब नाही मांडत बसायचं..*

*दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलंत बसायचं....*

   💧 *सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी ..*

🙏🏻🙏🏻

 *बाबा नेहमीच मागे का असतात*.??? हे माहित नाही. 🤔

◆ आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात. दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही... *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही. 

◆ आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. दोघांचे प्रयत्न समान आहेत. तरीही... *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.

◆ आई आपल्याला पाहिजे ते शिजवते. बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात. दोघांचे प्रेम समान आहे, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते. *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.

◆ जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असेच ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही, की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. पिढ्यानपिढ्या मुलांचे प्रेम मिळवतांना आपण पाहतो, की *बाबा नेहमीच मागे पडतात* का...??? हे माहित नाही.

◆ कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरलेले असतात, परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे असतात. कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नसते. तरी... *बाबा अजूनही मागे का आहेत* ??? हे माहित नाही.

◆ आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात, पण वडिलांकडे एकच रिंग असते, कदाचित ती ही नसते. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते, आणि बाबा कधीच करत नाहीत. तरी अजूनही *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही.

◆ आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात. पण घरातच जेव्हा जेव्हा ओळख मिळते, तेव्हा *बाबा नेहमीच का मागे पडतात*??? हे माहित नाही. 

◆ आई म्हणते, ह्या महिन्यात मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका, परंतु वडिल स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही. तरीही... *बाबा का मागे पडतात* ??? हे माहित नाही.

◆ आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीत कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा निरुपयोगी आहेत. *बाबा मागे का पडतात*..??? हे माहित नाही.

●●● वडील *मागे, ‘मागच्या बाजूला’* आहेत. कारण *ते कुटुंबाचा कणा आहेत.* त्यांच्यामुळेच आपण सगळे उभे आहोत.

म्हणून तर ते... *मागे* आहेत.

●●● *आई श्रेष्ठ आहे.* पण, म्हणून... *बाबा कनिष्ठ नाहीत,* एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, ...

*❤️...कुठलाही मोठेपणा न मिरवणारा बाबा आमचा भक्कम आधार आहे.*❤

🙏🙏 🙏*सर्व बाबांना समर्पित..* 🙏🙏🙏


 

Aurved


 

Ek sachai


 

Featured post

Lakshvedhi