दोन दिवसांपूर्वी एक विवाह जमवण्यासाठी उपस्थित होतो. मी मुलाकडील बाजूने होतो. मुलगा माझ्या मित्राचा होता. मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता. पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता. मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या. त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला.
✅#संपूर्ण विवाह वैदिक पद्धतीनुसार होईल. ✅
1. ✅कोणत्याही प्रकारचे विवाहपूर्व चित्रफीत अथवा छायाचित्रण होणार नाही.✅
2. ✅वधु विवाहप्रसंगी घागरा न घालता महाराष्ट्रिय पद्धतीची साडी नेसेल.✅
3. ✅विवाहस्थळी कसलेही कानठळ्या बसवणारे संगीत न वाजवता शांत संगीत वाजवण्यात येईल. ✅
4. ✅विवाहप्रसंगी म्हणजे हार घालतेवेळी केवळ वधु आणि वर मंचावर असतील ✅
5. हार घालतेवेळी वधु किंवा वरास उचलणार्यास विवाहमंडपातून बाहेर घालवण्यात येईल.✅
6. ✅गुरुजींनी विवाहविधी सुरु केल्यानंतर कोणीही त्यांना थांबवणार अथवा अडथळा आणणार नाही. ✅
7.✅ छायाचित्रकार अथवा चित्रफीत तयार करताना गुरुजींना दिशादर्शन करणार नाही. तो लांबूनच चित्रीकरण करेल. ✅
8. छायाचित्रकार वधुवरांना चित्रविचित्र पोजेस देण्यास सांगणार नाही.✅
9. वधुवरांना सर्व आमंत्रितासमोर आलिंगन देण्यास सांगणार्यास विवाहमंडपाचे बाहेर काढण्यात येईल. ✅
10. वधु अथवा वराकडील कोणताही पाहुणा दारु अथवा इतर विचित्र भोजनपदार्थ मागणार नाही.
11. कानठळ्या बसवणारे संगीत बिलकुलच लावण्यात येणार नाही.
12. भोजनामध्ये अथवा नाश्त्यामध्ये कोणतेही विचित्र पदार्थ असणार नाहीत. भोजन व नाश्ता पूर्णपणे महाराष्ट्रिय पद्धतीचे व साधे असेल.
13. विवाहप्रसंगी कोणतेही अचकट विचकट नाच होणार नाहीत.
14. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत.
आश्चर्य म्हणजे वधुकडील मंडळींनी काही वेळानंतर चर्चा करुन उपरोक्त मागण्या मान्य केल्या आणि विवाह साध्या पद्धतीने करण्याचे मान्य केले.
आजच्या काळात असा विवाह प्रस्तावित करणार्या या मुलाचे मी ताबडतोब अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment