सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 11 October 2021
Jai hind
*आताच्या पिढीला ‘उरी’, ‘राजी’, ‘एल.ओ.सी.- कारगिल' हे युध्दाशी संबंधित चित्रपट बऱ्यापैकी आवडले ..!! पण ह्या साऱ्यांवर मात करील असा एक चित्रपट, भारतीयांपर्यत फारसा पोहोचू शकला नव्हता ..!! नव्हे, २००७ साली प्रकाशित झालेला 'हा' चित्रपट, लोक पाहणारच असे कांहीसे घडले किंवा घडवले गेले ..!! पण ह्या लिखाणामुळे तुम्ही नक्कीच तो चित्रपट घरबसल्या पहाल ..!!*
*९ मार्च २००७ रोजी प्रकाशित झालेल्या ह्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अमृत सागर आणि लेखक आहेत पियुष मिश्रा ..!! प्रत्येक देशप्रेमी भारतीयाने आवर्जून हा चित्रपट पहावाच ..!! ह्या चित्रपटाचे शीर्षक आहे '१९७१' ..!!*
*ही एक सत्यकथा आहे ..!!*
*१९७१ चे भारत–पाकिस्तान युध्द संपल्यानंतर घडलेला पण जगापासून लपवलेला हा 'काळा इतिहास' आहे ..!! चित्रपटाचे चित्रीकरण दिवसा आणि रात्री कसे केले असेल ..?? ते किती कठीण असू शकते .. हे चित्रपट पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येईल ..!! चिरंतन दास ह्या छायाचित्रकाराला तुम्ही सलामच ठोकाल ..!!*
*मनोज बाजपेयी, मानव कौल, भोजपुरी नट रवी किशन ह्यांच्या सोबत स्वतः लेखक पियुष मिश्रा ह्यांच्या थक्क करणाऱ्या अभिनयाला तुम्ही नक्कीच दाद द्याल ..!!*
*ह्या चित्रपटात तुम्ही एवढे भावनात्मकरित्या गुंतुन जाल की हे चेहरे पुढचे कांही दिवस तरी डोळ्यांसमोरुन जाणारच नाहीत ..!!*
*विशेष म्हणजे ५५व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ह्या चित्रपटाला 'हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार' मिळून सुध्दा, तुम्हा-आम्हाला हा चित्रपट पाहताच आला नाही ..!! अनेकांनी तर नांव सुध्दा ऐकलेलं नसेल ..!!*
*प्रत्यक्ष युद्धाची पार्श्वभूमी किंवा युद्ध ह्या चित्रपटात नाही .. कारण, बांगलादेशच्या निर्मितीसोबत १९७१ मध्ये ते युद्ध संपले आणि हा चित्रपट जिथून सुरु होतो ते वर्ष दाखवलेय १९७७ ..!!*
*भारत-पाक सीमारेषेपासून फक्त २०० किमी अंतरावर घडत असलेले हे कथानक पाहून, तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहण्याची इतरांना शिफारस कराल ..!! शहरी वातावरणात वाढत श असलेल्या चंगळवादी तरुण-तरुणींनी हा चित्रपट पाहिला, तर त्यांना आपल्या सुखाच्या श्वासासाठी सीमेवरचे सैनिक प्रत्यक्षांत काय काय 'झेलतात' हे कळेल ..!! आजच्या भौतिक सुखाच्या स्पर्धेच्या दुनियेत, एका चित्रपट नटाचे अचानक निधन झाले किंवा, एखादा अभिनेता कोरोना बाधित होऊन रुग्णालयात उपचारासाठी गेला तर दुःखाश्रू ढाळणाऱ्यांनी एकदा तरी (हो, निदान एकदा तरी ..) हा चित्रपट शेवटपर्यंत पहावा अशी कळकळीची शिफारस मी करतो ..!! माझा त्यात कोणताही स्वार्थ किंवा आर्थिक फायदा नाही ..!!*
*इस्रायल हा जिद्दी लोकांचा कडवा आणि स्वाभिमानी देश आहे. त्यांच्याकडे घरातील प्रत्येक मुलाला देशाची सीमा आणि देशाचा इतिहास ठाऊक असतो .. नव्हे तोंडपाठ असतो ..!! (त्या देशाची लांबी-रुंदी फारच लहान असल्यामुळे, त्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या दिवशी सर्व देशप्रेमी ज्यू कुटुंबे, मुला-नातवंडांसह सीमा पाहायला आणि हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी, चक्क युद्धभूमीवर जमतात ..!! हे मी स्वतः दोन वेळा इस्रायलमध्ये, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि अनुभवलंय ..!!)*
*आमच्याकडे युद्धभूमी फारच दूर ..!! देशाच्या एका टोकाला ..!! कोण जातेय पाहायला ..?? म्हणूनच, सैनिकांच्या त्यागाची कोणाला काही चिंताच उरलेली नाही ..!! अशा वेळी, हा चित्रपट पाहून एक प्रसिद्ध गीत आठवले ..*
*'अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांsत ..*
*स्तंभ तिथे ना कुणी बांधला ..!! पेटली ना वात ..!!*
*लॉकडाऊनच्या काळात लोक घरी होते. हाताशी भरपूर वेळ होता .. नेमकं तेव्हाच, यु-ट्युबवर हा सत्यघटनेवर आधारित दर्जेदार चित्रपट, विनामूल्य पाहण्याची संधी 'सागर पिक्चर्स' हयांनी दिली ..!!*
*केवळ गेल्या ३ महिन्यांत, दोन कोटी चाळीस लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे .. म्हणजे तो अनेकांना भावलेला दिसतो आहे ..!!*
*विशेष म्हणजे, पूर्ण चित्रपटाला 'इंग्लिश सबटायटल्स' सुध्दा आहेत. (सबटायटल्स ऑन ठेवून तुमच्या घरातील 'इंग्रजाळलेले तरुण-तरुणी / विद्यार्थी' हा चित्रपट पाहू शकतात ..!!)*
*हा मास्टरपीस असलेला, '१९७१' अशा शीर्षकाचा विचारप्रवर्तक, प्रेरणादायी चित्रपट, एक 'राष्ट्रकर्तव्य' म्हणून संपूर्ण पहा ..!! सर्व वयोगटाला आवडेल असा हा दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी, थोsडासा वेळ काढा .. शक्य असेल तर स्मार्ट टीव्ही च्या मोठ्या पडद्यावर पहा ..!!*
*(कृपया ही पोस्ट बदल न करता, लेखकाच्या नांवासह इतरांकडे पाठवा ..!!)*
*चित्रपट पाहण्यासाठी खालील निळ्या लिंकवर क्लिक करा .. शेवटपर्यंत जरूर पहा आणि अवश्य शेअर करा ..!!*
👇🏽👇🏽💐🙂🙏🙏👆
https://youtu.be/gp3otKG7o6g
*धन्य ते वीर ..!! धन्य ती भारतमाता ..!!*
*आपला नम्र,*
*विवेक मेहेत्रे*
*(संपादक, लेखक, अभियंता, व्यंगचित्रकार)*
Sunday, 10 October 2021
कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील
निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये
· मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर तातडीने शासन निर्णय जारी
मुंबई, दि. ८ : शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्णसेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसमवेत बैठक घेऊन त्यांच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला.
तातडीने हा शासन निर्णय काढल्याबद्धल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती लढ्याची माहिती होईल
राज्यपालांच्या हस्ते बांगलादेश मुक्ती लढ्यातील वीरांचा सन्मान
मुंबई, दि. 09 : बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या 'अपूर्ण आत्मकथा' या मराठी भाषांतरीत पुस्तकामुळे राज्यातील लोकांना विशेषतः युवकांना बांगलादेशचा प्रदीर्घ मुक्तीसंग्राम, त्यातील भारताचे योगदान तसेच शेख मुजिबूर रहमान यांच्या व्यक्तित्वाबद्दल अधिक माहिती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
शेख मुजिबूर रहमान यांची जन्मशताब्दी तसेच बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शेख मुजिबूर रहमान यांच्या 'अनफिनिश्ड मेमॉयर्स' या पुस्तकाचे मराठी भाषांतर असलेल्या 'अपूर्ण आत्मकथा' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
बांगलादेशच्या मुंबईतील उपउच्चायुक्तालयाच्या पुढाकाराने प्रसिद्ध झालेले 'अपूर्ण आत्मकथा' अपर्णा वेलणकर यांनी मराठीत भाषांतरीत केले असून इंडिया प्रिंटिंग वर्क्सने ते प्रकाशित केले आहे.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी बांगलादेश मुक्ती संग्रामात प्रत्यक्ष व परोक्ष भाग घेतलेल्या निवृत्त नौदल प्रमुख अॅडमिरल विष्णू भागवत, लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंह ब्रार, लेफ्टनंट कमांडर अशोक बत्रा यांसह 20 युद्धवीरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला बांगलादेशचे मुंबईतील उप उच्चायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान, बांगलादेशचे नवी दिल्लीतील उप उच्चायुक्त नुरुल इस्लाम, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व ऑल इंडिया असोसिएशन फॉर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते. यावेळी बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ ए के एम अब्दुल मोमीन यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.
शेख मुजिबुर रहमान सच्चे धर्मनिरपेक्ष नेते होते. आपल्या पक्षाचे नाव त्यांनी 'मुस्लिम अवामी लीग' असे न ठेवता 'अवामी लीग' असे ठेवले असे राज्यपालांनी नमूद केले. अपर्णा वेलणकर यांनी शेख मुजीब यांच्या पुस्तकाचे मराठी भाषेत भाषांतर करून भारत व बांगलादेशातील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्यात मोठे योगदान दिले आहे असे राज्यपाल यावेळी म्हणाले. शेख मुजीब यांच्या 'प्रिझन डायरीज' या पुस्तकाचे देखील मराठीत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपालांच्या हस्ते अपर्णा वेलणकर तसेच इंडिया प्रिंटिंगचे आनंद लिमये यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बांगलादेश व भारताच्या राष्ट्रगीताने झाली.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...