*आताच्या पिढीला ‘उरी’, ‘राजी’, ‘एल.ओ.सी.- कारगिल' हे युध्दाशी संबंधित चित्रपट बऱ्यापैकी आवडले ..!! पण ह्या साऱ्यांवर मात करील असा एक चित्रपट, भारतीयांपर्यत फारसा पोहोचू शकला नव्हता ..!! नव्हे, २००७ साली प्रकाशित झालेला 'हा' चित्रपट, लोक पाहणारच असे कांहीसे घडले किंवा घडवले गेले ..!! पण ह्या लिखाणामुळे तुम्ही नक्कीच तो चित्रपट घरबसल्या पहाल ..!!*
*९ मार्च २००७ रोजी प्रकाशित झालेल्या ह्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अमृत सागर आणि लेखक आहेत पियुष मिश्रा ..!! प्रत्येक देशप्रेमी भारतीयाने आवर्जून हा चित्रपट पहावाच ..!! ह्या चित्रपटाचे शीर्षक आहे '१९७१' ..!!*
*ही एक सत्यकथा आहे ..!!*
*१९७१ चे भारत–पाकिस्तान युध्द संपल्यानंतर घडलेला पण जगापासून लपवलेला हा 'काळा इतिहास' आहे ..!! चित्रपटाचे चित्रीकरण दिवसा आणि रात्री कसे केले असेल ..?? ते किती कठीण असू शकते .. हे चित्रपट पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येईल ..!! चिरंतन दास ह्या छायाचित्रकाराला तुम्ही सलामच ठोकाल ..!!*
*मनोज बाजपेयी, मानव कौल, भोजपुरी नट रवी किशन ह्यांच्या सोबत स्वतः लेखक पियुष मिश्रा ह्यांच्या थक्क करणाऱ्या अभिनयाला तुम्ही नक्कीच दाद द्याल ..!!*
*ह्या चित्रपटात तुम्ही एवढे भावनात्मकरित्या गुंतुन जाल की हे चेहरे पुढचे कांही दिवस तरी डोळ्यांसमोरुन जाणारच नाहीत ..!!*
*विशेष म्हणजे ५५व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ह्या चित्रपटाला 'हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार' मिळून सुध्दा, तुम्हा-आम्हाला हा चित्रपट पाहताच आला नाही ..!! अनेकांनी तर नांव सुध्दा ऐकलेलं नसेल ..!!*
*प्रत्यक्ष युद्धाची पार्श्वभूमी किंवा युद्ध ह्या चित्रपटात नाही .. कारण, बांगलादेशच्या निर्मितीसोबत १९७१ मध्ये ते युद्ध संपले आणि हा चित्रपट जिथून सुरु होतो ते वर्ष दाखवलेय १९७७ ..!!*
*भारत-पाक सीमारेषेपासून फक्त २०० किमी अंतरावर घडत असलेले हे कथानक पाहून, तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहण्याची इतरांना शिफारस कराल ..!! शहरी वातावरणात वाढत श असलेल्या चंगळवादी तरुण-तरुणींनी हा चित्रपट पाहिला, तर त्यांना आपल्या सुखाच्या श्वासासाठी सीमेवरचे सैनिक प्रत्यक्षांत काय काय 'झेलतात' हे कळेल ..!! आजच्या भौतिक सुखाच्या स्पर्धेच्या दुनियेत, एका चित्रपट नटाचे अचानक निधन झाले किंवा, एखादा अभिनेता कोरोना बाधित होऊन रुग्णालयात उपचारासाठी गेला तर दुःखाश्रू ढाळणाऱ्यांनी एकदा तरी (हो, निदान एकदा तरी ..) हा चित्रपट शेवटपर्यंत पहावा अशी कळकळीची शिफारस मी करतो ..!! माझा त्यात कोणताही स्वार्थ किंवा आर्थिक फायदा नाही ..!!*
*इस्रायल हा जिद्दी लोकांचा कडवा आणि स्वाभिमानी देश आहे. त्यांच्याकडे घरातील प्रत्येक मुलाला देशाची सीमा आणि देशाचा इतिहास ठाऊक असतो .. नव्हे तोंडपाठ असतो ..!! (त्या देशाची लांबी-रुंदी फारच लहान असल्यामुळे, त्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या दिवशी सर्व देशप्रेमी ज्यू कुटुंबे, मुला-नातवंडांसह सीमा पाहायला आणि हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी, चक्क युद्धभूमीवर जमतात ..!! हे मी स्वतः दोन वेळा इस्रायलमध्ये, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि अनुभवलंय ..!!)*
*आमच्याकडे युद्धभूमी फारच दूर ..!! देशाच्या एका टोकाला ..!! कोण जातेय पाहायला ..?? म्हणूनच, सैनिकांच्या त्यागाची कोणाला काही चिंताच उरलेली नाही ..!! अशा वेळी, हा चित्रपट पाहून एक प्रसिद्ध गीत आठवले ..*
*'अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांsत ..*
*स्तंभ तिथे ना कुणी बांधला ..!! पेटली ना वात ..!!*
*लॉकडाऊनच्या काळात लोक घरी होते. हाताशी भरपूर वेळ होता .. नेमकं तेव्हाच, यु-ट्युबवर हा सत्यघटनेवर आधारित दर्जेदार चित्रपट, विनामूल्य पाहण्याची संधी 'सागर पिक्चर्स' हयांनी दिली ..!!*
*केवळ गेल्या ३ महिन्यांत, दोन कोटी चाळीस लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे .. म्हणजे तो अनेकांना भावलेला दिसतो आहे ..!!*
*विशेष म्हणजे, पूर्ण चित्रपटाला 'इंग्लिश सबटायटल्स' सुध्दा आहेत. (सबटायटल्स ऑन ठेवून तुमच्या घरातील 'इंग्रजाळलेले तरुण-तरुणी / विद्यार्थी' हा चित्रपट पाहू शकतात ..!!)*
*हा मास्टरपीस असलेला, '१९७१' अशा शीर्षकाचा विचारप्रवर्तक, प्रेरणादायी चित्रपट, एक 'राष्ट्रकर्तव्य' म्हणून संपूर्ण पहा ..!! सर्व वयोगटाला आवडेल असा हा दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी, थोsडासा वेळ काढा .. शक्य असेल तर स्मार्ट टीव्ही च्या मोठ्या पडद्यावर पहा ..!!*
*(कृपया ही पोस्ट बदल न करता, लेखकाच्या नांवासह इतरांकडे पाठवा ..!!)*
*चित्रपट पाहण्यासाठी खालील निळ्या लिंकवर क्लिक करा .. शेवटपर्यंत जरूर पहा आणि अवश्य शेअर करा ..!!*
👇🏽👇🏽💐🙂🙏🙏👆
https://youtu.be/gp3otKG7o6g
*धन्य ते वीर ..!! धन्य ती भारतमाता ..!!*
*आपला नम्र,*
*विवेक मेहेत्रे*
*(संपादक, लेखक, अभियंता, व्यंगचित्रकार)*
No comments:
Post a Comment