Tuesday, 5 October 2021

 निर्मिती संस्थांना लॉकडाऊन कालावधीतील

मूळ निर्धारीत भाड्याच्या 40 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 28 : कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात वेगवेगळ्या माध्यमांतील चित्रीकरण बंद असल्याने निर्मिती संस्थांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे निर्मिती संस्थांना चित्रीकरण स्थळाच्या आणि दीर्घ मुदतवाढ तत्वावरील संस्थांच्या भाड्यात दि. 15 एप्रिल 2021 ते 6 जून 2021 या कालावधीकरीता सवलत देण्यात येणार असून ही सवलत मूळ  निर्धारीत भाड्याच्या 40 टक्क्यांपर्यंत असेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

            महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 158 वी बैठक ऑनलाईन पध्दतीने आज आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री.सौरभ विजयमहाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे आणि सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

            चित्रनगरीच्या पायाभूत विकासास अनुसरुन दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी पायाभूत सुविधाअंतर्गत कलागारेचित्रीकरण स्थळे विकासासाठी ईओआय (EOI) (स्वारस्य अभिव्यक्ती) कार्यवाही करण्यात येत आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुरक्षिततेसाठी करार तत्वावर सुरक्षा व्यवस्था घेण्यात यावी, असेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

       त्याचप्रमाणे महामंडळाची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.  या सर्वसाधारण सभेमध्ये सन 2020-21 चे लेखे स्वीकृत करण्यात आले तसेच 95.06 लक्ष एवढा भरीव लाभांश घोषित करण्यात आला.

००००


अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी

1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

            मुंबईदि. 28 : अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तात्काळ नूतनीकरण करून घ्यावे. तसेच जे अन्न व्यावसायिक परवाना घेण्यासाठी पात्र आहेत परंतु त्यांनी नोंदणी केलेली आहे अशा अन्न व्यावसायिकांनी त्वरित परवाना घ्यावा. बृहन्मुंबई विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत अन्न व्यावसायिकांकडील परवानानोंदणी तपासण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व अन्न व्यावसायिकांनी सहभागी व्हावे,  असे आवाहन सह आयुक्त (अन्न)अन्न व औषध प्रशासनबृहन्मुंबई विभाग यांनी केले आहे.

            अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांना सूचित करण्यात येते कीअन्न व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमाअंतर्गत परवाना/नोंदणी करुनच अन्न व्यवसाय करावा. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा जास्त आहेत्यांनी परवाना घेणे आवश्यक असून ज्यांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा  कमी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी. जे अन्न व्यावसायिक विना परवाना/नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांचे विरुद्ध न्यायालयीन खटला दाखल करण्याची तजवीज असूनत्यामध्ये पाच लाखापर्यंत द्रव्य दंडाची व सहा महिने कारावासाची तरतूद करण्यात आलेली आहे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने दिल्या आहेत.

            परवाना / नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यात अर्ज करून ऑनलाईन शुल्क भरूनच व्यवसाय करावा. ऑनलाईन परवाना किंवा नोंदणीकरीता अर्ज करण्यासाठी www.foscos.fssai.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध असून त्याठिकाणी लागणारी कागदपत्रे व तत्सम बाबींसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. जेणेकरून कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करता येईल. अर्ज करताना अडचणी आल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने केले आहे.

***

 

इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर

फुड सेफ्टी ॲण्ड अप्लाईड न्युट्रीशनचा

वर्धापन दिन साजरा

            मुंबईदि. 28 : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर फुड सेफ्टी ॲण्ड अप्लाईड न्युट्रीशनचा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन एजन्सीमरोल एम आयडी सी अंधेरी येथील या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले.

             या कार्यक्रमाला FSSAI भारतीय खाद्य संरक्षण एवं मानके प्राधिकरणच्या अध्यक्षा श्रीमती रिता तेवतीयामुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघलअन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव सौरभ विजय आणि आयुक्त परिमल सिंग उपस्थित होते.

            यावेळी खाद्य सुरक्षेचे प्रशिक्षणासाठी ITCFSAN च्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘इट राईट पॅट्रान चॅलेंज’ या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी खाद्य सुरक्षा क्षेत्रातील स्पर्धकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

 फेसबुक सहा तास बंद पडल्यामुळे मार्क झुकरबर्गचे भारतीय रूपयांत 'रुपये 4,47,34,83,00,000 फक्त'  एवढं नुकसान झाल्याचं लोकसत्तेत वाचलं.


आपल्यासारख्या निव्वळ खंक लोकांच्या चिमत्कारिक पोस्टींच्या जीवावर तिकडे हा मनुष्य तासातासाला इतका गडगडगंज पैसा छापतो, हे फारच अद्भुत आहे. 


सालं मला आकडासुद्धा वाचता येईना तो.

 *पुढील वर्ष सुख समृद्धीचे* ....👍👍


आपले संवत्सर व पंचांग सांगते की आगामी वर्ष उत्तम आहे….

आपल्याला माहीत आहे का, भारतीय पंचांग पद्धतीमध्ये प्रत्येक वर्षाला एक विशिष्ट नाव असतं आणि प्रत्येक नावाचा एक खास अर्थ असतो...   अशी साठ नावं म्हणजेच संवतसर असतात आणि प्रत्येक नाव साठ वर्षांनी परत येतं. आपलं वर्ष इंग्लिश कॅलेंडर च्या एप्रिल महिन्याच्या मध्यावर सुरू होत असते.


आता बघा - २०१९-२० चे भारतीय नाव होते "विकारी"... त्यानं ते नाव खरं केलं...ते खरंच आजाराचंच वर्ष होतं...


१९२०-२१ चं भारतीय नाव होतं " शर्वरी",  म्हणजेच अंध:कार, जे त्यानं सार्थ केलं... जगाला रोगाच्या खाईत अधिकच लोटून...


आताचं १९२१-२२ वर्ष आहे "प्लव" नावाचं, याचा अर्थ आहे संकटातून तारून नेणारं...

या नावाचं वर्ष जगाला समस्यांच्या संकटांतून तारून समृद्धीकडे नेईल, अंधारातून प्रकाशाकडे नेईल, असं वराह संहितेत म्हटलं आहे...


त्याहून शुभ वार्ता अशी आहे की या पुढचं म्हणजे १९२२-२३ हे वर्ष आहे " शुभकृत ".


 या नावात...उघडच आहे की ते वर्ष सुख समृद्धीचे आणणार...


उद्या चांगला असेल, अशी आशा आपण आज ठेवायला हरकत नाही...!


 आपले पंचांग तशी ग्वाही, नक्कीच देत आहेत आपल्याला.....!!


🙏शुभम भवतु 🙏🌹🌹

 [10/5, 4:14 PM] O Mishra: एक सभा में गुरु जी ने प्रवचन के दौरान एक 30 वर्षीय युवक को खडा कर पूछा कि


- आप मुम्बई मेँ जुहू चौपाटी पर चल रहे हैं और सामने से एक सुन्दर लडकी आ रही है , तो आप क्या करोगे ?*


युवक ने कहा - उस पर नजर जायेगी, उसे देखने लगेंगे।


गुरु जी ने पूछा - वह लडकी आगे बढ गयी , तो क्या पीछे मुडकर भी देखोगे ?


लडके ने कहा - हाँ, अगर धर्मपत्नी साथ नहीं है तो। (सभा में सभी हँस पडे)


गुरु जी ने फिर पूछा - जरा यह बताओ वह सुन्दर चेहरा आपको कब तक याद रहेगा ?


युवक ने कहा 5 - 10 मिनट तक, जब तक कोई दूसरा सुन्दर चेहरा सामने न आ जाए।


गुरु जी ने उस युवक से कहा - अब जरा कल्पना कीजिये..* *आप जयपुर से मुम्बई जा रहे हैं और मैंने आपको एक पुस्तकों का पैकेट देते हुए कहा कि मुम्बई में अमुक महानुभाव के यहाँ यह पैकेट पहुँचा देना... 


आप पैकेट देने मुम्बई में उनके घर गए। उनका घर देखा तो आपको पता चला कि ये तो बडे अरबपति हैं। घर के बाहर 10 गाडियाँ और 5 चौकीदार खडे हैं।


उन्हें आपने पैकेट की सूचना अन्दर भिजवाई , तो वे महानुभाव खुद बाहर आए। आप से पैकेट लिया। आप जाने लगे तो आपको आग्रह करके घर में ले गए। पास में बैठाकर गरम खाना खिलाया।


चलते समय आप से पूछा - किसमें आए हो ?

आपने कहा- लोकल ट्रेन में।


उन्होंने ड्राइवर को बोलकर आपको गंतव्य तक पहुँचाने के लिए कहा और आप जैसे ही अपने स्थान पर पहुँचने वाले थे कि उस अरबपति* *महानुभाव का फोन आया - भैया, आप आराम से पहुँच गए..


अब आप बताइए कि आपको वे महानुभाव कब तक याद रहेंगे ?


युवक ने कहा - गुरु जी ! जिंदगी में मरते दम तक उस व्यक्ति को हम भूल नहीं सकते।


गुरु जी ने युवक के माध्यम से सभा को संबोधित करते हुए कहा — "यह है जीवन की हकीकत।"


"सुन्दर चेहरा थोड़े समय ही याद रहता है, पर सुन्दर व्यवहार जीवन भर याद रहता है।"


बस यही है जीवन का गुरु मंत्र... अपने चेहरे और शरीर की सुंदरता से ज़्यादा अपने व्यवहार की सुंदरता पर ध्यान दें.. जीवन अपने लिए आनंददायक और दूसरों के लिए अविस्मरणीय प्रेरणादायक बन जाएगा..

जीवन का सबसे अच्छा योग

सहयोग हैं,

[10/5, 4:27 PM] O Mishra: *चुकवू नये असे काही.....*


दि.७ ते १४ ऑक्टोबर दरम्यान  डीडी सह्याद्री वाहिनीवर दररोज  रात्री ८ वाजता अजरामर अशा "गीतरामायणा"चे प्रसारण होणार असून दि.१५ ऑक्टोबर  विजयादशमी( दसरा) या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून "गीतरामायणाचे" दोन तासांचे विशेष प्रसारण होणार आहे. 


सादरकर्ते- प्रसिद्ध गायक, संगीतकार श्रीधर फडके व सहकारी. 


सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.

Monday, 4 October 2021

 सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत

गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 

मुंबई दि. 4 : गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रोत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दि. ७ ते १५ ऑक्टोबर२०२१ दरम्यान नवरात्र / दुर्गापुजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोवीड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वनआपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन विभागाने "ब्रेक द चेन" अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावाजाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच "माझे कुटुंबमाझी जबाबदारी" या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबादांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमे / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोनामलेरियाडेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईनकेबल नेटवर्कवेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी तसेच देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरतीभजनकीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

महापालिकाविविध मंडळेगृहनिर्माण संस्थालोकप्रतिनिधीस्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी.

विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तरमूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे सोहळा बघण्याची व्यवस्था करावी.

            कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसनआरोग्यपर्यावरणवैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिकापोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक आहे.

००००

 पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या

सेवा प्रवेश नियामांमध्ये करण्यात यावा

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 4 पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल कोर्सबाबत बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकरउपसचिव प्रकाश सुरवसेउपसचिव सुरेद्र चानकरवैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे डॉ. सुशिल दुबेडॉ. अरुणकुमार व्यास यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले कीसध्या राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 13 पॅरामेडिकल कोर्सेस (बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) सुरु असून साधारणपणे यासाठी 2000 जागा उपलब्ध आहेत. या पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच अधिकाधिक मनुष्यबळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

            पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती अधिक होण्याकरिता जिल्हास्तरावरील महाविद्यालयांमार्फत जास्तीत जास्त वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात यावी. पॅरामेडिकल अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारीत पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचे कोविड-19 काळात दिसून आले आहे.येणाऱ्या काळात या 13 अभ्यासक्रमांमधील कोणत्या अभ्यासक्रमांची पुर्नरचना करणे आवश्यक आहे याबाबतचा अभ्यास करुन त्यांची पुर्नरचना वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी करावी. तसेच अभ्यासक्रमाच्या पाठयक्रमामध्ये आवश्यक बदल व श्रेणीवर्धनाच्या दृष्टीने अभ्यासगट म्हणून उच्च स्तरीय समिती गठीत करुन त्याची पुर्नरचना करण्यात यावी, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.

००००


 

महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पारदर्शक

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

 

            मुंबईदि. 4 : महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणीही दक्ष राहून करण्यात येणार आहे. कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नसल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

            एच एस बी सी, फोर्ट येथील महावितरण कंपनीच्या इमारतीत राज्यातील निवडक विद्युत सहायक उमेवारांच्या शंका निरसन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

            ऊर्जा राज्यमंत्री श्री.प्राजक्त तनपुरे म्हणाले, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल पारदर्शकपणे जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत माध्यमांतून आणि समाजमाध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होते. याकरिता राज्यातील विविध भागातून विद्युत सहायक पदासाठी अर्ज केलेले आणि या निकालावर शंका असलेल्या उमेदवारांना बोलावून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. निकालात कसल्याही प्रकारची चुक झाले नसल्याचे श्री.तनपुरे यांनी स्पष्ट केले.

            सर्व निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये कट ऑफराखीव जागाआरक्षणगुणांकन आदी बाबी स्पष्ट होतील. त्यानंतर कोणाचीही शंका राहणार नाही. भरती प्रक्रिया लवकर पुर्ण करण्यासाठी कागदपत्रे तपासणी करून नियुक्ती पत्रेही देण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे. सर्व उमेदवारांना न्याय मिळणार आहे. कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री.तनपुरे यांनी यावेळी केले.

 अणुउर्जेसह व्यापारपर्यटन व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास अर्जेंटिना उत्सुक

: ह्यूगो जेवियर गोबी

·       अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

 

            मुंबई, दि. 4 : अर्जेंटिना भारताशी अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात सहकार्य करीत असून व्यापारसंस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत  ह्यूगो जेवियर गोबी यांनी सांगितले.  

            राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी सोमवारी (दि. ४ ऑक्टो) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली,  त्यावेळी ते बोलत होते.

            भारताप्रमाणेच  अर्जेंटिना देखील विलक्षण सुंदर देश आहे. 2019 मध्ये अर्जेंटिनाच्या २ दशलक्ष पर्यटकांपैकी केवळ १४००० पर्यटक भारतात आले तर भारताच्या १३ दशलक्ष पर्यटकांपैकी अवघे ८००० पर्यटक अर्जेंटिना पाहण्यास आले. हे चित्र बदलून उभय देशातील परस्परांच्या पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

मेसीचे चाहते भारतात अधिक : राज्यपाल

            भारतात पर्यटनाच्या अनेक संधी असून अर्जेंटिनाने पर्यटन वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे राज्यपाल कोश्यारी यांनी राजदूतांना सांगितले. फ़ुटबाँल भारतात लोकप्रिय खेळ असून अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटू मेसीचे चाहते अर्जेंटिनापेक्षा भारतात अधिक असल्याचे तसेच दंतकथा झालेले दिएगो मॅराडोना सर्वपरिचित असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

            बैठकीला अर्जेंटिनाचे मुंबईतील वाणिज्यदूत गिलर्मो एड्युआर्दो डेव्होतोउपवाणिज्य दूत सिसिलिया मोनिका रिसोलोअर्जेंटिना दूतावासातील राजकीय विभाग प्रमुख रेनाटो मोरालेस हे उपस्थित होते.

*****


Argentinian Ambassador meets Governor Koshyari

Calls for enhancing relations in Trade, Tourism and Culture

            Stating that Argentina has lots of ongoing cooperation with India in the field of nuclear research, the Ambassador of Argentina to India Hugo Javier Gobbi called for strengthening the cooperation with India in the areas of trade, tourism and culture.

            The Ambassador was speaking to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Monday (4th Oct) during a courtesy call. 

            Calling for a major fillip to tourism between India and Argentina, the Ambassador said Argentina, like India, is an incredibly beautiful country. He however lamented that only 8000 tourists from out of 13 million Indian tourists visited Argentina in the year 2019 while only 14000 tourists from Argentina’s 2 million tourists visited India.

More Messi fans in India : Governor

            Stating that India offers tremendous opportunities for tourism, the Governor sought cooperation from Argentina in increasing tourism. The Governor said football is a popular sport in India and added that there are more fans of Messi in India than perhaps in Argentina. He said Argentinian football legend Diego Maradona is a household name in the country.

            The Consul General of Argentina in Mumbai Guillermo Devoto, Deputy Consul General Cecilia Risolo and Head of Political Section in the Embassy of Argentina Renato Morales were present.

Featured post

Lakshvedhi