Friday, 24 September 2021

 ई - पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ

जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा

- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

·        महसूल व कृषी विभागाने टीम वर्क म्हणून काम करण्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

·        राज्यातील तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, तलाठी , कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक संघटनांसोबत  बैठक

 

               मुंबई दि. 21 : ई - पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून महसूल व कृषी या दोन्ही विभागांनी समन्वयाची भूमिका घ्यावी व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ई - पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलबजावणीसंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत राज्यातील तहसीलदार, तलाठीतालुका कृषि अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्या संघटनांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

                सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्त धीरजकुमारजमाबंदी आयुक्त एन.के.सुधांशू यांच्यासह  तहसीलदार, तलाठीतालुका कृषि अधिकारी, कृषी सहाय्यक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          ई - पीक पाहणी हा प्रकल्प कृषी, महसूलपणन व इतर विभागांसाठी लाभदायक ठरणार असून हा प्रकल्प देशासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही महसूल मंत्री श्री.थोरात यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अनेक शेतकऱ्यांचे अर्ज दुरुस्ती अभावी प्रलंबित आहेत. ते अर्ज येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढावेत, अशी सूचना श्री.थोरात यांनी केली.

          कृषि मंत्री दादाजी भुसे म्हणाले कीमहसूल व कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी कार्य करीत असून पीकविमानैसर्गिक आपत्ती इत्यादी विषयात दोन्ही विभाग समन्वयाने काम करीत असतात. त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या दोन्ही योजनामध्ये टीम वर्क करून योजना राबविताना काही अडचणी असल्यास समन्वयाने मार्ग काढावा. ई - पीक पाहणी प्रकल्पात काही सुधारणा करणे गरजेचे असेल तर त्या अवश्य केल्या जातील.

एकही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहता काम नये

       ई - पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या दोन्ही योजनांच्या लाभापासून राज्यातील पात्र शेतकरी वंचित राहणार नाहीत याची सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. हे पुण्याचे काम आहे या भावनेने त्याकडे पहावे. ई - पीक पाहणी प्रकल्पात सातबारावर पिकांची नोंद घेण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजून सांगावे, असे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी केले.


 *भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांनी गायलेली 'श्री गणेश स्तृती' आपण अवश्य ऐकली पाहिजे. या विद्वान शास्त्रज्ञ राष्ट्रपतीने गणेशाची केलेली स्तुती आपल्याला मंत्रमुग्ध करेल.*


 

 

 आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण;

उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

- सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 23 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेअसे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

            आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबर २०२१ रोजी आणि गट ड संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा श्री. टोपे यांनी आढावा घेतला.

             सह्याद्री विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यासआरोग्य आयुक्त एन. रामास्वामीआरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटीलसंचालक डॉ. साधना तायडेराष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.

            उमेदवारांना हॉल तिकीट वेळेत मिळावेसर्व्हर व्यवस्थित सुरू असावाउमेदवारांना काही शंका असल्यास त्यांचे समाधान करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करावीअशा सूचना श्री टोपे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी यांना सूचना

            राज्यातील आरोग्य विभागातील अधिकारी यांनी ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लक्ष घालावे. परीक्षा जरी बाह्यस्त्रोताद्वारे घेतली जात असली तरीही सर्व जिल्हाधिकारी यांनीही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये काही व्यक्ती परीक्षेबाबत गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावीत्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पहावेअशा सूचना पोलीस विभागाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवारांनी प्रलोभनास बळी पडू नये

             उमेदवारांनी प्रामाणिकपणे अभ्यास करुनच परीक्षेस उपस्थित राहावे. कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. परीक्षेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विभागामार्फत संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. निवड ही केवळ गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे, असेही श्री.टोपे यांनी सांगितले.

सहा हजार दोनशे पदांसाठी परीक्षा

             आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहेअसेही श्री. टोपे स्पष्ट केले.

             उमेदवारांना परीक्षेबाबत काही शंका असल्यास त्यांनी कॉल सेंटरच्या हेल्पलाईन अथवा जिल्ह्यातील संबंधित कार्यालयात संपर्क साधावाअसे आवाहनही त्यांनी केले.

0000

 


 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी

जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे

                    - राज्य निवडणूक आयुक्त

          मुंबईदि. 23 (रानिआ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावीअसे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.

            श्री. मदान यांनी सांगितले कीराज्यभरातील महानगरपालिकानगरपरिषदा/ नगरपंचायतीजिल्हा परिषदापंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात मोठ्याप्रमाणावर निवडणुका होणार आहेत. संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. त्यादृष्टीने आतापासूनच संबंधितांनी तयारी करणे आवश्यक आहे. जेणे करून नामनिर्देशनपत्र सादर करताना ऐनवेळी कोणाचीही धावपळ होणार नाही आणि एकही इच्छूक उमेदवार जातवैधता प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार नाही.

0000

 *"बारमध्ये चाललोय"  गं.....*

*हे बायकोला सांगण्याचे धाडस 

                                                                                                                              *फक्त वकिलांमध्ये* *असते...!*

😂😂😂😂😂😂😂😂😂

 ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम् आरोग्य कवच विमा

योजना लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत

 - मंत्री धनंजय मुंडे

 

ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षणआरोग्य तपासणी व अभिसरण करण्याची कार्यपद्धती होणार निश्चित

 

            मुंबई, दि. 22 - : राज्यातील 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणेत्यांना ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करणे या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या महत्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

            राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असूनएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त श्रीमती रुबल अग्रवालएन यु एच एमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवारडी एम ई आरचे उपसंचालक डॉ. अजय चांदनवालेजे जे रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकरसमाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरेग्रामविकास विभागातील आस्थापना उपसचिवतसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आस्थापना उपसचिव हे या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

            ज्येष्ठ नागरिकांकरिता आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांबाबत शिफारशी करणेया योजनेअंतर्गत आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करणेबाबतच्या कार्यपद्धतीबाबत शिफारस करणेया योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधीत ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त होण्याबाबत व त्यात आजार आढळल्यास त्याचे निदान करणेबाबत तसेच आरोग्य विभागाच्या व इतर योजनेमध्ये अभिसरण करण्याची कार्यपद्धतीबाबत शिफारस करणेइत्यादी बाबींसह शरद् शतम योजनेच्या एकूणच कार्यपद्धतीला निश्चित करण्यासाठी शिफारशी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी या समितीवर नेमण्यात आली असूनसमितीने ठराविक वेळेत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

0000

जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी

नेमलेला अभ्यासगट मंत्रीमंडळाला अहवाल सादर करणार

- अभ्यास गटाचे अध्यक्ष तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

अभ्यास गटाची बैठक

 

            मुंबईदि. 22 : अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राआधारे सेवेत रूजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवा व सेवानिवृत्तीविषयक लाभांबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेला अभ्यासगट हा आपला अहवाल लवकरच मंत्रीमंडळाला सादर करणार असल्याची माहिती अभ्यास गटाचे अध्यक्ष तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.

            मंत्रालयातील परिषद सभागृहातअनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत रुजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी  व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवा व सेवानिवृत्तीविषयक लाभांबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी गठीत केलेल्या अभ्यासगटाची बैठक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवीगृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाडसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थिती होती. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

******


Featured post

Lakshvedhi