Thursday, 23 September 2021

 महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती

लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार

            राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदानगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल. 

            महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदानगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करुनराज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. तथापिकोवीड-19 दरम्यान निर्माण झालेली आरोग्य विषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिंधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरणजबाबदारी पारपाडणे निर्वाहन हे प्रभागात सामुहिक प्रतिनिधित्वांमुळे (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती) अधिक उचित पध्दतीने होऊ शकते या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमात सुधारणा करुन महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

            त्यानुसारमहानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्यपरंतुदोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

-----०-----

 

नागरी स्थानिक संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे

आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी अध्यादेश काढणार

            नागरी स्थानिक संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे  आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यास आणि एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्याप्रमाणे अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येईल.

            मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम 5(A)(4), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 5(A)(1)(C) व महाराष्ट्र नगरपरिषदानगरपंचायती व औद्योगि‍क नगरी अधिनियमातील कलम 9(2)(D) मध्ये सुधारणा करुन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असणारे 27 टक्के हे स्थिर (Static)  प्रमाण बदलून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण 27 टक्क्या पर्यंत ठेवण्यास एकुण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्के पेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यात येईल.

            प्रस्तावित अधिनियमात सुधारणा आरक्षणाचे एकूण प्रमाण 50 टक्के पेक्षा अधिक नसावे तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सर्वच नागरी स्थानिक संस्थांमध्ये सरसकट 27 टक्के नसावे हा मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आशय विचारात घेऊन करण्यात आली आहे.

-----०-----

 अंधश्रद्धा


लोक म्हणतात, देवपूजा ब्राह्मणांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केली, देव कधीही पूजा करायला सांगत नाही, मग तसं तर असेही म्हणता येईल की....


देवाला फुलं वाहिली पाहिजेत हे शेतकऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले, 


देवाला हार घाला वगैरे हे फुले विक्रेत्यांनी, दोरे वाल्यांनि आणि हार बनवणार्यांनी सुरू केले,


देवाला फळं पाहिजेत हे शेतकऱ्यांनी आणि फळ विक्रेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले,

देव आपल्याकडे कधीही काही मागत नाही..

नका वाहू


केळीची खुंट लावा, तांदूळ वहा, नारळ वहा...

शेतकरी फायदासाठी सुरू केले,

देव काहीही मागत नाही


देवासाठी मंदिर बांधले पाहिजे हे सिमेंट, वाळू, विटा, मारबल विकणार्यांनी, गवंडीकाम करणाऱ्या कामगारांनी ,स्वतःच्या फायद्यासाठी सूरु केले,

देव काय झाडाखाली दगड ठेवला तरी चालतो देवाला.


मंडप बांधला पाहिजे हे मंडपवाल्या लोकांनी, बांबू ची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी, कापड उद्योग करणार्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले..

देवाला मंडपाची पण गरज नसते,


रखीपोर्णिमा ला राखी बांधली पाहिजे हे राखी बनवण्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले, 

एका राखीने काय फरक पडतो?

राखी न बांधून घेता ही आपल्याला बहिणीचे रक्षण करावेच लागेल


मग राखी बांधताना कुंकू लावा,

कुंकू विक्रेते,

कुंकू कशाला लावले पाहिजे?

विक्रेत्यांनी सुरू केले,


दिवा ओवाळा,

त्यासाठी तूप, दुधाचे बनते, त्यामुळे त्यांच्या फायद्यासाठी सुरू झाले, ओवालायला कशाला पाहिजे? 


अत्तर लावा,

अत्तर विक्रते यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले.


डोक्यावर अक्षता वहा,

तांदूळ पिकबणारे शेतकरी यांच्या फायद्यासाठी


रंगपंचमी, रंग बनवणारे विक्रेते यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केली


आपट्याची पाने वाटा,

पाने विक्रेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले


गुडीपाडवा,

काठी, कापड, बत्तासेमाळ, लोटी बनवणारे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले


गणपती, मूर्तिकार, मातीकाम करणारे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बनवले,


गणपती विकणार्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केले,


मग गणपती विकले पाहिजे म्हणून परत रस्त्यावर मंडप, मंडपवाल्यांचा फायदा...


परत घरात गणपती, मग त्याला मखर वगैरे,

संबंधित लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केलं...


मग गणपतीत मिरवणुकीत ढोल ताशे , dj वाजवले पाहिजे, 50000 रुपये सुपारी असते, 2-3 लाख रुपये डीजे चे भाडे, हे सर्व स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले,


मग परत ढोल ताशे वाजवायला फेटा पाहिजेच,

फेटेवल्यानी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले?

फेटा न बांधता पण येतात की ढोलताशे वाजवता...


आणि ढोलताशे देवाला कशाला लागतात?

ढोल ताशे बनवणार्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले...


रस्त्यावर फ्लेक्स लागले पाहिजे हे फ्लेक्स, प्रिंटिंग वाल्यांनि स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले, 

तुमच्या शुभेच्छा घ्यायला फ्लेक्स कशाला पाहिजे?

कोण तुम्ही शुभेच्छा देणारे?


गाडीच्या काचेवर आपल्या जातीचे स्टिकर लागले पाहिजे, मोर्चात आपल्या जातीचा झेंडा फिरवलाच पाहिजे, हे सर्व छाप खान्या वाल्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले


मग मिरवणुकीसाठी रथ वगैरे,

त्यांनी पण स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले


डेकोरेशन ला लाईट माळा लागल्या पाहिजे, भाड्याने पण मिळतात,

यांनी पन स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले...


परत, तेल,कापूर, उदबत्ती लावली पाहिजे,

यांच्या फायद्यासाठी सुरू केले


ऍडमिशन साठी डोनेशन???


न संपणारी यादी आहे...


4 टक्के ब्राह्मणांमधील 0.0001% लोकं पौरोहित्य (पुजारी काम) करतात , त्यामुळे पौरोहित्य बंद झाले तरी एकाही ब्राह्मणाला काहीही फरक पडणार नाही... पण या सर्व सणांच्या उद्योगावर जगणारे 70% लोकं आहेत...


पण ब्राह्मणांनी देवाची आराधना सुरूच नसते केले, तर हे 70% आज काय करत असते???


आणि...


सरकारी खात्यामध्ये पगार मिळत असूनही काम करायला लाच घेणे हे कोणी सुरू केले...


किती लाच खातात?


एकतर 40% मार्कंवर पण नोकरी मिळवतात, हजरो रुपये पगार असतो,

तरीही लाखो रुपये लाच खातात...त्यावर बोला की...


नगर सेवक , भाऊ अण्णा काका वगैरे लेबल लावून स्विफ्ट वरून फॉर्च्युनर घेतात, मेहनत नाही, लोकांचे पैसे खाऊन... ते कसे चालते?

त्यांच्यासमोर बरोबर शेपूट दुमडते..


रस्त्यावर टॅक्स न भरता ही अतिक्रमण कोणी सूरु केले?


दारू ची दुकाने कोणाची? व्यसनं लावली लोकांना ते कोण?


तंबाखू गुटका विकणारे कोण?


नको त्या फालतू विषयावर चर्चा करण्यापेक्षा हे बघा ना मग...


पूजा करणे कंपल्सरी नाहीये,

पण कॉर्पोरेशन  मध्ये लाच देने कंपल्सरी आहे, त्यावर बोला


आपले सण, पूजा, आरती वगैरे हे 70 टक्के लोकांचा जीवनाचा आणि रोजगाराचा आधार आहे,

त्यांचा मान राखा,


सण नाही , पूजा अर्चा नाही तर करोडो लोकं बेरोजगार होतील....


CP

Ganapati bappa morya


 

Wednesday, 22 September 2021

Shravan sampala

 


Swaroop sampat

 *अत्यंत स्वरूपसुंदर अभिनेत्री स्वरूप संपत*


ही 'ये जो है जिंदगी' या नितांत सुंदर मालिकेची नायिका आज जगातील पहिल्या दहा सर्वश्रेष्ठ शिक्षकांमध्ये एक आहे. इंग्लंडमध्ये तिने Ph. D आणि तीही संपूर्ण शिष्यवृत्तीवर मिळवली आहे. १७९ देश, दहा हजार स्पर्धेतील सहभागी एकूण शिक्षक यातून तिची निवड झाली आहे. 'जीवनकौशल्ये' यावर तिचे प्रभुत्व असून अनेक शाळांमध्ये तिने कार्यशाळा, शिबिरे व शिक्षकांना प्रशिक्षण देऊन एक अद्भुत कामगिरी केली आहे. 


मिस इंडिया ही स्पर्धा तिने जिंकली व नंतर त्यांचे परेश रावल यांच्याबरोबर लग्न झाले. फार चांगले आणि उच्च विचार व मुलांविषयी प्रचंड प्रेम आणि आस्था असलेली एक आई अशा शब्दात तिनी स्वतःचे वर्णन केले आणि ती तशी वागलीही आहे आणि वागतही आहे, हे अत्यंत विनम्र भावाने पण अभिमानाने ती सांगते. परेश रावल यांनी ती Ph. D. करून आल्यावर तिला विचारले की, आता तु कोणते काम करणार आणि किती पैसे मिळवशील ? हा प्रश्न विचारला असता तिने सांगितले की, इतके इतके पैसे मिळविन. तर परेश त्यांना म्हणाले, की तू शिक्षक म्हणून काम करणार असशील, तर एकही पैसा घेऊ नकोस. आपल्याकडे पैसे भरपूर आहेत. आणि त्यानी  दाखवून दिले कि, खरोखरच ती नुसती स्वरूपसुंदर नसून मनाने देखील तितकीच सुंदर आहे. हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे.


आजतागायत तिने एकही पैसा न आकारता मोफत सर्व काही केले आहे. अत्यंत द्वाड मुले आणि एक वर्गात अजिबात न बोललेली मुलगी व तिच्यात त्यांनी केलेले परिवर्तन पाहून सर्व शिक्षक आश्चर्यचकित कसे झाले, हे मुळातून ऐकण्यासारखे होते. 

Ph. D.साठी प्रवेश मिळाला, पण संपूर्ण शिष्यवृत्ती केवळ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना पत्र लिहून कशी मिळवली व त्यानंतरचा त्यांचा बेस्ट टिचर हा प्रवास त्यांच्याच शब्दातून ऐकण्यासारखा आहे. 

एका मुलाखत घेणाऱ्या निवेदिकेने तिला प्रश्न केला की, लोकांचा असा समज असतो ना की, तुम्ही सिनेमा जगात वावरणाऱ्या, घरी नोकर-चाकर असतील, परेश रावळ यांच्या पत्नी आहात, तर तुम्हाला काय वाटते ? वगैरे..

त्यांनी उत्तर दिले, 'I am typical middle class Indian woman and I am above all Indian mother and I am proud of it'. तिने मुलांच्या शिक्षणासाठी जे बदल करायचे आहेत, त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिले आहेत आणि त्यावर सरकार विचार करेल असा विचार देखील बोलून दाखवला. ही सर्व मुलाखत तिने मराठी भाषेत बोलून दिली हे विशेष. 


एक अभिनेत्री, मिस इंडिया, ते डॉक्टरेट, एक जागतिक दर्जाची शिक्षिका आणि मुलांच्यात रमणारी एक आई अशी सर्वांगसुंदर स्त्री असा फार फार सुंदर प्रवास करत स्वतःबरोबर इतरांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या या स्वरूपसुंदर  शिक्षिकेस शतशः प्रणाम🙏🏻

Art


 

Featured post

Lakshvedhi