Thursday, 23 September 2021

 अंधश्रद्धा


लोक म्हणतात, देवपूजा ब्राह्मणांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केली, देव कधीही पूजा करायला सांगत नाही, मग तसं तर असेही म्हणता येईल की....


देवाला फुलं वाहिली पाहिजेत हे शेतकऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले, 


देवाला हार घाला वगैरे हे फुले विक्रेत्यांनी, दोरे वाल्यांनि आणि हार बनवणार्यांनी सुरू केले,


देवाला फळं पाहिजेत हे शेतकऱ्यांनी आणि फळ विक्रेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले,

देव आपल्याकडे कधीही काही मागत नाही..

नका वाहू


केळीची खुंट लावा, तांदूळ वहा, नारळ वहा...

शेतकरी फायदासाठी सुरू केले,

देव काहीही मागत नाही


देवासाठी मंदिर बांधले पाहिजे हे सिमेंट, वाळू, विटा, मारबल विकणार्यांनी, गवंडीकाम करणाऱ्या कामगारांनी ,स्वतःच्या फायद्यासाठी सूरु केले,

देव काय झाडाखाली दगड ठेवला तरी चालतो देवाला.


मंडप बांधला पाहिजे हे मंडपवाल्या लोकांनी, बांबू ची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी, कापड उद्योग करणार्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले..

देवाला मंडपाची पण गरज नसते,


रखीपोर्णिमा ला राखी बांधली पाहिजे हे राखी बनवण्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले, 

एका राखीने काय फरक पडतो?

राखी न बांधून घेता ही आपल्याला बहिणीचे रक्षण करावेच लागेल


मग राखी बांधताना कुंकू लावा,

कुंकू विक्रेते,

कुंकू कशाला लावले पाहिजे?

विक्रेत्यांनी सुरू केले,


दिवा ओवाळा,

त्यासाठी तूप, दुधाचे बनते, त्यामुळे त्यांच्या फायद्यासाठी सुरू झाले, ओवालायला कशाला पाहिजे? 


अत्तर लावा,

अत्तर विक्रते यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले.


डोक्यावर अक्षता वहा,

तांदूळ पिकबणारे शेतकरी यांच्या फायद्यासाठी


रंगपंचमी, रंग बनवणारे विक्रेते यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केली


आपट्याची पाने वाटा,

पाने विक्रेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले


गुडीपाडवा,

काठी, कापड, बत्तासेमाळ, लोटी बनवणारे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले


गणपती, मूर्तिकार, मातीकाम करणारे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बनवले,


गणपती विकणार्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केले,


मग गणपती विकले पाहिजे म्हणून परत रस्त्यावर मंडप, मंडपवाल्यांचा फायदा...


परत घरात गणपती, मग त्याला मखर वगैरे,

संबंधित लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केलं...


मग गणपतीत मिरवणुकीत ढोल ताशे , dj वाजवले पाहिजे, 50000 रुपये सुपारी असते, 2-3 लाख रुपये डीजे चे भाडे, हे सर्व स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले,


मग परत ढोल ताशे वाजवायला फेटा पाहिजेच,

फेटेवल्यानी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले?

फेटा न बांधता पण येतात की ढोलताशे वाजवता...


आणि ढोलताशे देवाला कशाला लागतात?

ढोल ताशे बनवणार्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले...


रस्त्यावर फ्लेक्स लागले पाहिजे हे फ्लेक्स, प्रिंटिंग वाल्यांनि स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले, 

तुमच्या शुभेच्छा घ्यायला फ्लेक्स कशाला पाहिजे?

कोण तुम्ही शुभेच्छा देणारे?


गाडीच्या काचेवर आपल्या जातीचे स्टिकर लागले पाहिजे, मोर्चात आपल्या जातीचा झेंडा फिरवलाच पाहिजे, हे सर्व छाप खान्या वाल्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले


मग मिरवणुकीसाठी रथ वगैरे,

त्यांनी पण स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले


डेकोरेशन ला लाईट माळा लागल्या पाहिजे, भाड्याने पण मिळतात,

यांनी पन स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केले...


परत, तेल,कापूर, उदबत्ती लावली पाहिजे,

यांच्या फायद्यासाठी सुरू केले


ऍडमिशन साठी डोनेशन???


न संपणारी यादी आहे...


4 टक्के ब्राह्मणांमधील 0.0001% लोकं पौरोहित्य (पुजारी काम) करतात , त्यामुळे पौरोहित्य बंद झाले तरी एकाही ब्राह्मणाला काहीही फरक पडणार नाही... पण या सर्व सणांच्या उद्योगावर जगणारे 70% लोकं आहेत...


पण ब्राह्मणांनी देवाची आराधना सुरूच नसते केले, तर हे 70% आज काय करत असते???


आणि...


सरकारी खात्यामध्ये पगार मिळत असूनही काम करायला लाच घेणे हे कोणी सुरू केले...


किती लाच खातात?


एकतर 40% मार्कंवर पण नोकरी मिळवतात, हजरो रुपये पगार असतो,

तरीही लाखो रुपये लाच खातात...त्यावर बोला की...


नगर सेवक , भाऊ अण्णा काका वगैरे लेबल लावून स्विफ्ट वरून फॉर्च्युनर घेतात, मेहनत नाही, लोकांचे पैसे खाऊन... ते कसे चालते?

त्यांच्यासमोर बरोबर शेपूट दुमडते..


रस्त्यावर टॅक्स न भरता ही अतिक्रमण कोणी सूरु केले?


दारू ची दुकाने कोणाची? व्यसनं लावली लोकांना ते कोण?


तंबाखू गुटका विकणारे कोण?


नको त्या फालतू विषयावर चर्चा करण्यापेक्षा हे बघा ना मग...


पूजा करणे कंपल्सरी नाहीये,

पण कॉर्पोरेशन  मध्ये लाच देने कंपल्सरी आहे, त्यावर बोला


आपले सण, पूजा, आरती वगैरे हे 70 टक्के लोकांचा जीवनाचा आणि रोजगाराचा आधार आहे,

त्यांचा मान राखा,


सण नाही , पूजा अर्चा नाही तर करोडो लोकं बेरोजगार होतील....


CP

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi