सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 21 September 2021
समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याची
राज्याची परंपरा अबाधित
- उपमुख्यमंत्री अजित पवार
· मुंबईत कुणबी विद्यार्थी वसतीगृहासाठी 5 कोटीचा धनादेश प्रदान
मुंबई, दि. 20 : राज्यातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याला आजवर लाभलेल्या प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केले आहेत. ही परंपरा महाराष्ट्रात यापुढेही अबाधित राहील, जपली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतीगृहाच्या इमारतीसाठी 5 कोटी रुपयांच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रम झाला.
उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणाले, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी शासन कटाक्षाने घेते. या वसतीगृह इमारती बांधणी प्रक्रियेत सौर ऊर्जेचा वापर व्हावा, अनावश्यक खर्च टाळावे, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पर्यावरणपूरक इमारत बांधण्यात यावी. इमारत बांधणीसाठी काही अडचणी आल्यास त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.
खासदार श्री.सुनील तटकरे म्हणाले, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधणीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार धनादेश वाटपाचा कार्यक्रम होत आहे. कुणबी समाजासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या वसतीगृहात राहून समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी विविध क्षेत्रात नक्कीच प्राविण्य मिळवतील असा विश्वासही खासदार श्री. तटकरे यांनी व्यक्त केला.
कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरीत प्रवेशासाठी मुलाखत, स्पर्धा परीक्षेची तयारी, वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी हे वसतीगृह उपयुक्त ठरेल, अशा विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना कुणबी समाजोन्नती संघ व राज्य शासनाच्या मदत निधीतून होत आहे. याबाबत संघाच्या पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी श्री.बाबाजी जाधव, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, संदिप रायपूरे व संघाचे पदाधिकारी व सभासद कार्यक्रमास उपस्थित होते.
00000
डॉ रविंद्र कुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील
अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई दि. 20 : वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ रविंद्र सिंगल यांच्या सायकल शर्यतीवरील अनुभवांचे संकलन असलेल्या ‘पेडलिंग जर्नी : डेक्कन क्लिफहँगर’ पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे करण्यात आले.
डॉ सिंगल यांनी २०१७ मध्ये पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ हँगर या ६४३ किलोमीटरच्या सायकलींगच्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता. ही शर्यत ही अतिशय खडतर होती तसेच विशिष्ट कालमर्यादेत ती पुर्ण करणे अतिशय आवश्यक होते. त्याकरिता मानसिक व शारिरीक तंदुरुस्ती, तसेच सराव क्रमप्राप्त होता. याकरिता डॉ सिंगल यांनी ६ महिने प्रशिक्षण घेतले.
त्यांनी ४ नोव्हेंबर, २०१७ रोजी प्रत्यक्षात शर्यतीत भाग घेतला. त्यांच्याबरोबर इतर काही प्रतिस्पर्धी होते, परंतु मानसिक व शारिरीक थकव्यामुळे काहींना सदरील शर्यत मध्येच सोडून दिली. तथापि, डॉ सिंगल यांनी मानसिक इच्छाशक्तीच्या जोरावर शर्यत वयाच्या पन्नाशीतही त्यांनी पूर्ण केली.
शर्यतीचा ६४३ किलोमीटरचा सायकलवरील खडतर प्रवास करताना शारिरीक व मानसिक क्षमतांचा पूर्ण कस लागला तो प्रवास तरुणांचे मनोधैर्य व मनोबल उंचावण्याकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरावा म्हणून डॉ.सिंगल यांनी हे पुस्तक लिहिले. डॉ.वैशाली बालाजीवाले या पुस्तकाच्या सह लेखिका आहेत.
पुस्तक प्रकाशन प्रसंगी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल देखील उपस्थित होत्या.
००००
*मुम्बई हाइकोर्ट के सीनियर वकील डी के श्रीवास्तव द्वारा लिखी इस पोस्ट से आप के ज्ञान में वृद्धि होगी।*
🤔🤔🤔🤔🤔
*VVV IMPORTANT...*
*क्या भारत का सिस्टम*
*आम जनता को धोखा देता है ?*
आप खुद देखिये....
1- नेता चाहे तो दो सीट से एक साथ चुनाव
लड़ सकता है ! लेकिन....
आप दो जगहों पर वोट नहीं डाल सकते,
2-आप जेल मे बंद हो तो वोट नहीं डाल
सकते..लेकिन
नेता जेल मे रहते हुए चुनाव लड सकता है.
3-आप कभी जेल गये थे, तो
अब आपको जिंदगी भर
कोई सरकारी नौकरी नहीं मिलेगी,
लेकिन……
नेता चाहे जितनी बार भी हत्या या बलात्कार के मामले म जेल गया हो, फिर भी वो प्रधानमंत्री या राष्ट्रपति जो चाहे बन सकता है,
4-बैंक में मामूली नौकरी पाने के लिये
आपका ग्रेजुएट होना जरूरी है..
लेकिन,
नेता अंगूठा छाप हो तो भी भारत का फायनेन्स मिनिस्टर बन सकता है।
5-आपको सेना में एक मामूली
सिपाही की नौकरी पाने के लिये डिग्री के साथ 10 किलोमीटर दौड़ कर भी दिखाना होगा,
लेकिन....
नेता यदि अनपढ़-गंवार और लूला-लंगड़ा है
तो भी वह आर्मी, नेवी और ऐयर फोर्स का चीफ यानि डिफेन्स मिनिस्टर बन सकता है
और
जिसके पूरे खानदान में आज तक कोई स्कूल नहीं गया.. वो नेता देश का शिक्षामंत्री बन सकता है
और
जिस नेता पर हजारों केस चल रहे हों..
वो नेता पुलिस डिपार्टमेंट का चीफ यानि कि गृह मंत्री बन सकता है.
यदि
आपको लगता है की इस सिस्टम को बदल देना चाहिये..
नेता और जनता, दोनो के लिये एक ही कानून होना चाहिये..
तो
इस संदेश को फार्वड करके देश में जागरुकता लाने में अपना सहयोग दें..
अगर फोरवर्ड नहीं किया तो आप किसी भी नेता को दोषी मत कहना ....,
नहीं किया तो नुकसान का जिम्मेदार आप खुद होगें
सरकारी कर्मचारी 30 से 35 वर्ष की संतोष जनक सेवा करने के उपरांत भी पेशन का हकदार नहीं ? जब कि मात्र 5 वर्ष के लिए विधायक / सांसद को पेंशन यह कहाँ का न्याय है...?
🏤 🎓
श्री D. K. Srivastava
मुख्य सरकारी वकील
मुंबई उच्च न्यायालय.
मुंबई.....
इस मुहिम को आगे बढाए
DON'T DELETE,
WE ACTUALLY NEED TO CHANGE THIS SYSTEM.
[9/21, 6:38 AM] Gym Bhosalee: फाॅरवर्डेड पोस्ट आहे. आऊट आॅफ बाॅक्स विचार करायला शिक्षणातली मास्टर्स डिग्री वगैरे काही लागत नाही.
*भीमाचे गर्वहरण*
कौरवांच्या नाशानंतर भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, माझी शेपूट हलवून बाजूला कर म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.
मी एकदा सोलापूर रस्त्याने पुण्याला गाडीतून एकटाच येत होतो. संध्याकाळी सहाचा सुमार होता. हायवेला भांडगावच्या एका मंगल कार्यालयातले लग्नकार्य आटोपले होते. कार्यालयाच्या दारात "बुढ्ढीके बाल" विकणारा पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना लिफ्टसाठी हात करत उभा होता.
काळा पिवळा चौकडीचा हाफ शर्ट, पायात साध्याशा चपला, खांद्यावरच्या दांडीला ५-१५ बुढ्ढीके बाल च्या पिशव्या लटकवलेल्या, खांद्याला रिकामी शबनम झोळी.
म्हटलं आज याला AC गाडीतून lift द्यावी. हा तरी कधी गाडीत बसणार ? त्याच्यासाठी गाडी थांबवल्याचे त्याला आश्चर्य वाटले.
तो गाडीत बसला व माझी बडबड सुरू झाली. त्याचं नाव बबलू, तो हडपसरला भाड्याने रहात होता.
काय काय विकता ?
- बुढ्ढी के बाल, साबणाचे बुडबुडे व साधे मोठे फुगे.
दिवसाला किती बुढ्ढीके बाल विकले जातात ?
- तीन एकशे. ५ रुपयाला एक.
ते कसे बनवतात ?
- मग बबलूने ती process सांगितली. २ किलो साखरेतून तीनशे पिशव्या बनतात वगैरे.
२ किलो साखर म्हणजे - - -
- फारतर १०० रुपये आणि या पिशव्या विकून त्याला १५०० रुपये मिळत होते. म्हणजे १४०० रुपये नफा .. दिवसाला. म्हणजे महिन्याला ? माझ्या डोक्यात आकडेमोड वेगाने सुरू झाली.
आणि बुडबुडे व फुगे कुठेत ?
- संपले.
त्यांच्यातही कमीतकमी १००% नफा होता. बबलूच्या दिवसाच्या नफ्याचा आकडा माझ्या कल्पेनेपेक्षा खूप मोठा होत चालला होता.
इथे कसे काय ?
- लग्न असलं की विक्री चांगली होते. पुण्यापासून (१०० किलोमीटर दूर असलेल्या) इंदापूरपर्यंतच्या सर्व मंगल कार्यालयांच्या मॅनेजरशी माझे कॉंट्रॅक्ट आहे. मी फोननुसार विक्रीला आलो की मॅनेजरला १०० रुपये द्यायचे. ... उन्हाने रापलेला, साधासा दिसणारा पण दिवसाकाठी किमान २ ते ३००० रुपये नफा करणारा बबलू सांगत होता.
पण इतक्या सर्वांशी कॉंट्रॅक्ट करून काय उपयोग ? तू तर एकाच ठिकाणी जाऊ शकतो. माझा सवाल.
- मुलं ठेवली आहेत ना....
त्याचं शांत उत्तर.
गावचीच १८-२० मुलं आहेत. २ खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. मेहुणा मार्केटिंग करून raw material आणतो. मी सगळ्यांसाठी बुढ्ढीके बाल बनवतो. मुलांना महिना १०-१२,००० पगार देतो ....
माझ्या डोळ्यांसमोर आकडे नाचत होते. हा माणूस महिना २ लाख रुपये पगार वाटतो. आणि रहाणं, खाणं, पिणं वगळता प्रत्येक मुलामागे महिना ७०-८०,००० रुपयांचा नफा कमावतो. अशी १८-२० मुलं. म्हणजे स्वत:सकट महिन्याला याचा निव्वळ नफा?
दिल्लीजवळ मीरतला रहातो. तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादाने तीन मजली इमारत आहे,२ गाड्या आहेत. बबलू सांगत होता, मी बधिर होऊन गाडी चालवत होतो.
४-५ दिवसांनी मी व बायको म्हात्रे पुलाजवळ dp road वर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारीच मंगल कार्यालय होतं. दारात एक मुलगा बुढ्ढीके बाल विकत उभा होता.
मी त्याच्याजवळ गेलो आणि विचारलं, _कुठे रहातोस ?_
तो म्हणाला : हडपसरला
_बबलूकडे का ?_
तो चकित.
त्याला सांग, _रविवारी तो ज्या गाडीने इंदापुरहून आला त्याचा "ड्रायव्हर" भेटला होता._
भीमाच्या ताकदीचे पार गर्वहरण झालं होतं.
[9/21, 6:38 AM] Gym Bhosalee: आजकालच्या मुलांना भाजी आवडली नाही तर मम्म्या किती ऑप्शन देतात..* 🤔
मॅगी खातो का? ब्रेडला जाम लावून देऊ? पिज्जा खा? बर्गर ऑर्डर कर, पार्सल मागव, हे करू का ते करू...
आमच्या आईकडे दोनच ऑप्शन होते..
*जे आहे ते खातो.. का मार खातो..?
आम्ही दोन्ही खात होतो..
*आधी मार.. मग आहे ते..!*
😫😫🤣
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

