Sunday, 19 September 2021


 

  

 

दै. प्रहार (दि. १९ सप्टेंबर)


सेल्फी


लेखक: चंद्रकांत बर्वे


गणपती the elephant god. 


बघता बघता आता श्रीगणेशाच्या विसर्जनाची वेळ आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मान्यता असलेला देव म्हणजे गणपती म्हणजेच elephant god. गणपतीच्या जन्माची कथा तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. आता पार्वतीने आपल्या अंगाचा मळ काढून त्याचे मुल बनवले आणि स्वतः अंघोळ करताना त्याला द्वारपालाची भूमिका दिली आणि तिथे भगवान शंकर आले, त्यांना त्या बाळाने थांबवताच शंकराने रागाने त्या मुलाचे मुंडके उडवले आणि नंतर आपली चूक लक्षात आल्यावर एका हत्तीचे मुंडके त्या मुलाच्या धडाला बसवले वगैरे. आता काही मंडळी त्या काळात आमचे वैद्यक ज्ञान किती प्रगत होते वगैरेच्या पुष्ट्यर्थ ही कथा सांगतात. त्यांच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. हां पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये झाडे फुले,पाने, वृक्षांना तसच प्राणिमात्राला खूप महत्व आहे. आपण जर आपल्या पुराणातल्या कथा कल्पना वाचल्या तर याची आवर्जून प्रचीती येते. गणपतीपुढे उंदीर असतो, शंकरापुढे नंदी बैल असतो. दत्ताची गाय शिवाय कुत्रे देखील असतात. शंकराच्या गळ्यात नाग असतो, तर लक्ष्मीचे वाहन घुबड असते. गरुड, घोडा, वाघ हे प्राणी तर निरनिराळ्या देव देवतांचे वाहन आहेतच आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण सर्वोच्च स्थानावर असणाऱ्याला देतो ते असते सिंहासन. अहो आपले देव सुद्धा बघाना हनुमान म्हणजे monkey god. अन गणपती म्हणजे elephant god. नरसिंह अवतार तर भगवान विष्णूचा अवतार. भगवान विष्णूचे तर आपण दशावतार मानतो. त्यात मत्स्यावतार हा पहिला अवतार, जीवाची उत्क्रांतीला सुरुवात देखील पाण्यातच झाली. पुढे कूर्म म्हणजे पाणी व जमिनीवर जगणारे कासव आले. त्यानंतर जमिनीवरचे डुक्कर देखील आपल्याला निषिद्ध नाही.  पण आपण सर्वात महत्व देतो ते बुद्धीला  अन या बुद्धीची देवता म्हणजे श्री गणेश. देवता सर्वात जास्त अत्याधुनिक पद्धतीने भक्तीभावाने पुजली जाते.


 महाराष्ट्रातील अष्टविनायक, मुंबईचा सिद्धिविनायक तर संपूर्ण भारतभर सर्वांना माहित आहेच. महाराष्ट्रातील गणेशोत्सव देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे.  गणेशोत्सवाच्या काळात सर्वच माध्यमातून त्यावर खूप बोलले जाते. तर त्यानिमित्ताने आपण आज हत्तीविषयी काही गोष्टी समजून घेऊया कारण माणसाच्या शरीराला हत्तीचे मुंडके असलेला हा देव बुद्धीची देवता म्हणून सर्वोच्च स्थानावर आरूढ आहे. निसर्गातील सर्वच प्राण्यांना आपल्या संस्कृतीत स्थान असताना हत्ती या प्राण्याला मात्र सर्वात मोठा सन्मान का? याचे उत्तर जर आपण या प्राण्याचे निरीक्षण आणि अभ्यास केला तर मिळेल. 


हत्ती हा समूहात राहणारा प्राणी आहे. त्यांचा समाज हा मातृसत्ताक असतो. आपल्या माणसांची समाज व्यवस्था देखील एकेकाळी मातृसत्ताक होती. उदाहरणार्थ पांडव हे कुंतीचे पुत्र म्हणून ओळखले जायचे. हत्तींच्या प्रत्येक कळपाची प्रमुख ही सगळ्यात ज्येष्ठ मादीच असते तिच्या नेतृत्वाखाली तो कळप आपली वाटचाल करत असतो. हत्तीची स्मरणशक्ती ही चांगली असते. पाण्याची वाणवा असताना पाण्याचे आणखी स्त्रोत कुठे आहेत हे या हत्ती आजीला ठाऊक असते. ती त्यानुसार समूहाला दिशादर्शन करू शकते. कुठल्या एकांड्या हत्तीवर जर सिंहासारख्या प्राण्याकडून हल्ला झाला तर हत्ती अतिशय कमी फ्रिक्वेन्सीच्या आवाजातून आपण संकटात असल्याची ओरड करतो. तो आवाज ८ कि मी पर्यंतच्या इतर हत्तींना ऐकू जाऊ शकतो व ते मदतीला येतात. आपल्या बाळाचे प्रेम हे इतर प्राण्यांपेक्षा हत्तींमध्ये जास्त दिसून येते. हत्तींचा कळप एकत्र समुहाने संचार करत असतो. त्यातील एखाद्या पिल्लाला जर इजा झाली तर बाकी या पिल्लाला सोडून पुढे जात नाहीत हाच हत्ती आणि इतर प्राणी यांच्यातला मुख्य फरक. इतर चार पायांच्या जनावरात पिल्लाला दुध पाजण्याचे सड किंवा स्तन हे मागील दोन पायांमध्ये असतात पण हत्तींचे मात्र पुढील पायात असतात. इथे तो मानव प्राण्याच्या जवळ येतो. 

आपण सर्व माणसे आपल्या पूर्वजांना नेहमीच आदर देत आलेलो आहोत. सर्व धर्मात तीच शिकवण आहे. हत्तींच्या बाबतीत देखील ही गोष्ट खरी आहे. हत्तींचा कळप जरी एकीकडे जंगल तुडवीत जात असला तरी जेंव्हा एखाद्या मृत हत्तीची कवटी रस्त्यात आढळते तेंव्हा ते पायाने न तुडवता ते त्याच्या प्रती आदर दाखवताना दिसतात. त्यांना हत्तीच्याच डोक्याचे ते हाड आहे हे बरोबर समजते. असा पूर्वजांबद्दल आदरभाव मानव प्राण्याशिवाय फक्त हत्तीन्मध्येच दिसून येतो, अन्य कुठल्याही प्राण्याला ही  समज नाही. मुळात हा प्राणी जरी जंगली असला तरी तो अतिशय चांगल्या पद्धतीने माणसाळू शकतो. अशा या प्राण्याच्या दाताला म्हणजेच हस्तिदंताला चांगला बाजारभाव असल्यामुळे दुर्दैवाने त्यांची अनधिकृत रित्या शिकार केली जाते, याच्यासारखे दुर्दैव ते काय! आपल्या देशात त्याविरुद्ध कडक कायदे आहेत पण वीरप्पन सारख्या चंदन चोरांनी ते धाब्यावर बसवले होते. आता मात्र सध्या आपल्या देशात हत्तींची स्थिती सुधारते आहे. उत्तर पूर्वेला काझीरंगा आणि दक्षिणेला कर्नाटकच्या जंगलात हत्तींची संख्या स्थिर आहे. असो बंगाल, कर्नाटक,आसाम, आदि राज्यातून हत्तींच्या कळपांचा मानवी वस्तीला त्रास होतो ही गोष्ट जरी खरी असली तरी तो दोष त्या हत्तींचा नाही तर वाढते शहरीकरण आणि मानवाची अतीलालसा त्याला कारणीभूत आहेत. csbarve51@gmail.com  

 

 मंत्रिमंडळ बैठक : दि. 15 सप्टेंबर 2021

एकूण निर्णय-5

 

मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही

यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणार

 

            महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण ठेवूनओबींसीसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांहून जास्त होणार नाही अशी सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            या अधिनियमात सुधारणा करण्याचा ग्राम विकास विभागाने प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने चर्चा होवुन मंत्रीमंडळाने खालीलप्रमाणे अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अध्यादेशात करण्यात येणारी सुधारणा पुढीलप्रमाणे,

        महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10पोटकलम (2)चा खंड (ग) आणि कलम 30पोटकलम (4) चा खंड (ब) आणि  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या  कलम 12पोटकलम (2) चा खंड (ग)कलम 42पोटकलम (4)चा खंड (ब)कलम 58पोटकलम (1ब) चा खंड (क) आणि कलम 67पोटकलम (5) चा खंड (ब) मध्ये  नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के पर्यंत आरक्षण ठेवणे तसेच सदर आरक्षण ठेवताना  एकूण मागासवर्गीय जागांपैकी  अनुसूचित जाती + अनुसूचित जमाती + ओबीसीं  (ना.मा.प्र.) चे एकत्रित आरक्षण  ५० टक्के पेक्षा जास्त होणार नाही  अशी सुधारणा करण्यात येईल. हा सुधारित अध्यादेश ग्राम विकास विभागातर्फे काढण्यात येईल.

-----०-----

आदिवासीबहुल आठ जिल्ह्यातील क व ड गटातील

पदांसाठी सुधारित आरक्षणास मंजुरी

            अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पालघरनाशिकधुळेनंदूरबारयवतमाळचंद्रपूरगडचिरोलीरायगड या 8 जिल्ह्यांमधील आरक्षण जिल्हा व प्रवर्गनिहाय पुढील प्रमाणे-

             पालघरनाशिकधुळेनंदूरबार या 4 जिल्ह्यांमध्ये अनु.जाती 10 टक्केअनु.जमाती 22 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 15 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के, यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्केअनु.जमाती 14 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 17 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 34 टक्के, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनु.जाती 13 टक्केअनु.जमाती 15 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 19 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के, गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्केअनु.जमाती 24 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 17 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 24 टक्के, रायगड जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्केअनु.जमाती 9 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 19 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 37 टक्के.

-----०-----

 

सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेसाठी

जमीन खरेदी व्यवहारातील मुद्रांक शुल्क माफ

            सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेच्या जमीन खरेदी व्यवहारातील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेच्या आणि संबंधित मूळ शेतमालक यांच्या दरम्यान होणाऱ्या जमीन हस्तांतरणासाठी व्यवहार होणार आहे. या व्यवहारातील मुद्रांक अधिनियमानुसार द्यावे लागणारे सुमारे 6 लाख 66 हजार 474 रुपयांचे मुद्रांक शुल्क तसेच या व्यवहारासाठी नोंदणी नियमानुसार द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

-----०-----

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा

आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

            कोकणामध्ये कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेवून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  या प्रकल्पांतर्गत सुमारे 3 हजार 200 कोटी पैकी 2 हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित 1200 कोटी रुपये पुढील 4 वर्षात (सन 2022-25) राज्याच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.

            या प्रकल्पात क्षमता बांधणी आणि पूर्वतयारी तसेच सौम्यीकरण निधीचा योग्य व सर्वसमावेशक वापरासाठी 4 वर्षासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संनियंत्रण गट (Project Monitoring Unit) व सल्लागारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी  होणारा खर्च क्षमता बांधणी व पूर्वतयारीसाठी उपलब्ध निधीच्या 7 टक्के मर्यादेत व सौम्यीरकणासाठी उपलब्ध निधीच्या 3 टक्के मर्यादेत राज्य योजनेमधून विभागास मंजूर होणाऱ्या तरतूदीतून खर्च करण्यास मान्यताही देण्यात आली.

-----०-----


 

 

अमरावती जिल्ह्यातील पेढी बॅरेज योजनेच्या

खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता

 

            अमरावती जिल्ह्यातील पेढी बॅरेज या उपसा सिंचन योजनेच्या 361 कोटी 61 लाख रुपयांच्या खर्चास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            हा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळनागपूर अंतर्गत टेंभा गावाजवळून वाहणाऱ्या पेढी नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे अमरावती तालुक्यातील 7 गावातील 2 हजार 232 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.  या प्रकल्पाचा लाभ कृषी सिंचनासह पिण्यासाठी पाणीपुरवठा व मत्स्य व्यवसाय यासाठी होणार आहे.

-----०-----


 

 

ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 15 : पक्क्या अनुज्ञप्ती चाचणी (Driving License Test) चे स्लॉट बुकींग करण्यासाठी अर्जदारांनी सकाळी १०.०० वाजता अर्ज ऑनलाईन पध्दतीने http:/sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर सादर करावा. असे आवाहन मुंबई प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

            प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) येथे पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीकरिता जास्तीत जास्त ९० दिवसांपर्यंत स्लॉट बुकींग करता येतो. पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीकरीता असलेल्या ठराविक कोट्याकरिता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्राथम्याने सादर झालेल्या अर्जाचाच स्विकार संगणकाद्वारे केला जातो. ठराविक कोटा पूर्ण झाल्यानंतर त्या दिवसाकरिता ऑनलाईन स्लॉट बुकींग बंद होते. इच्छुकांनी सकाळी १०.०० वाजता प्राथम्याने आपला अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावा.असे प्रादेशिक परिवहन अधिकारीमुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशनच्या कामकाजाची

आरोग्य मंत्री टोपे यांनी घेतली माहिती

 

            मुंबईदि. 13 : तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशनच्या वतीने केल्या जात असलेल्या  उपाययोजनांपैकी राज्याच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब केला जाईलअसे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

            श्री. टोपे यांनी चेन्नई येथे भेट देऊन तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशनच्या कामाची माहिती घेतली. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ.दारेज अहमदउपायुक्त डॉ.मनिष आदी उपस्थित होते.

            श्री.टोपे यांनी भेटीत तमिळनाडू वैद्यकीय पुरवठा साखळीची माहिती घेतली. तमिळनाडू वैद्यकीय साहित्यऔषधे पुरवठा करण्याबाबत राबवण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची माहिती घेतली. तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशन राबवत असलेल्या उपाययोजना यासंदर्भात फेरबदल करुन महाराष्ट्रात राबवण्यात येतील. जेणेकरुन राज्यातील वैद्यकीय साधनसामग्री आणि औषध पुरवठा अधिक जलद आणि सुसूत्र पद्धतीने होईलअसे श्री.टोपे यांनी सांगितले.

            श्री.टोपे यांनी यावेळी तमिळनाडूत राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य व्यवस्थेंतर्गत राब‍विल्या जाणाऱ्या उत्तम उपाययोजनांचाही आढावा घेतला.

 साकीनाका प्रकरणी तपासात कुठलाही हलगर्जीपणा नसल्याबद्दल

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे समाधान

·       मुख्यमंत्र्यांनी स्वत: आयोगाच्या उपाध्यक्षांना बोलविले चर्चेस

 

            मुंबई दि. 13 : साकीनाका येथे महिलेवरील बलात्कार आणि त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्यशासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने स्वत: चर्चेसाठी बोलावून या घटनेकडे राज्यशासन गांभिर्याने पहात असून पिडीतेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देण्यात येईल व तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल, असे आयोगास सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलमुख्य सचिव सिताराम कुंटेपोलीस महासंचालक संजय पांडेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहगृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवसामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमारमहिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आय. एस. कुंदनपोलीस आयुक्त हेमंत नगराळेसह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलमिलिंद भारंबे आदिंची उपस्थिती होती.

पिडीत महिलेच्या कुटूंबास तातडीने आर्थिक सहाय्य

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पिडीत महिलेच्या मुलांना, परिवारास महिला बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जाईल. या महिलेच्या मुलांच्या शिक्षण व पालन-पोषणाच्या बाबतीतही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे आयोगाच्या उपाध्यक्षांना सांगितले.

अनाथनिराश्रित महिलांसाठी घरांबाबत विचार

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेज्या निराश्रित व अनाथ महिला रस्त्यांवर राहतात त्यांच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून घरकूल योजना सुरू करता येते का यासंदर्भात विचार करता येवू शकतो. यासंदर्भात आयोगाने अशा स्वरुपाची योजना आखण्याविषयी केंद्र शासनास सूचना करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तपासात हलगर्जीपणा नसल्याबद्दल समाधान

            राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनीही घटना घडताच अवघ्या काही वेळात पोलिसांनी धाव घेतली व महिलेस मदत केली. त्याचप्रमाणे पुढे देखील वेगाने तपास करुन आरोपीस अटक केली याविषयी समाधान व्यक्त केले. पोलिसांना धन्यवाद देवून ते म्हणालेपिडीत महिलांना आपण न्याय देवू शकतो हे दाखविण्यासाठी प्रशासनाने चांगली पावले उचलली आहेत. आता लवकरात लवकर खटला जलदगती न्यायालयात उभा करुन गुन्हेगारास फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरुन गुन्हेगारांना धाक राहील.

            पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणालेही घटना कळता क्षणी दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचलेएवढेच नाही तर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेस स्वत: टेम्पो चालवत पोलीसांनी तिला रुग्णालयात पोहोचवले.

राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेवून विशेष सरकारी अभियोक्ता यांची हा खटला न्यायालयात उभा राहण्याअगोदरच नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे प्रसिद्ध वकील राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी पोलीस आयुक्तांनी दिलीयावर आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी समाधान व्यक्त केले.  

सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढवणार

            ही घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मुंबई शहरात 5 हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून 7 हजार कॅमेरे बसविणे सुरु आहे अशी माहिती देवून सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले कीशहरातील सर्व मॉल्ससंस्थादुकाने यांना रस्त्याच्या दिशेकडील कोनात कॅमेरे बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशारीतीने शहरात सुमारे 50 हजारापेक्षा जास्त कॅमेरे कार्यरत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

००००

 राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उद्घाटन

सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा: राज्यपाल

 

            मुंबई दि :12,मुंबई विद्यापीठाने गणेशोत्सव सुरु असतानाच आपल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा श्रीगणेशा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राने पर्यावरणस्नेही परिसर अशी वेगळी ओळख निर्माण करावी व आदर्श शैक्षणिक परिसर होण्यासाठी प्रयत्न करावेअशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. 

            राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्घाटन झालेत्यावेळी ते बोलत होते. ठाणे व रत्नागिरीनंतर विद्यापीठाचे सिंधुदुर्ग हे तिसरे उपकेंद्र आहे.

उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतखासदार विनायक राऊतआमदार दिपक केसरकरकुलगुरू डॉ सुहास पेडणेकरप्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णीकुलसचिव बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत व कुलगुरू सुहास पेडणेकर दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी विद्यापीठातील तसेच देशविदेशातील तज्ज्ञ व प्राध्यापकांना सिंधुदुर्ग परिसर येथे निमंत्रित करावे व तेथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे. कालांतराने सिंधुदुर्ग उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजेअशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग येथे उपकेंद्र सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उपकेंद्राला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

00000

 

Governor inaugurates Sindhudurg Sub Centre of University of Mumbai

 

 Mumbai date 12 :Governor of Maharashtra and Chancellor of the Universities Bhagat Singh Koshyari inaugurated the Sindhudurg Sub Centre of the University of Mumbai through online mode on Sunday (१२ Sept). This is the third subcentre of the University, the two others being Thane and Ratnagiri.

        Minister of Higher and Technical Education Uday Samant, Member of Parliament Vinayak Raut, MLA Deepak Kesarkar, Vice Chancellor Dr Suhas Pednekar, Pro VC Ravindra Kulkarni, Registrar Baliram Gaikwad were prominent among those present.

00000


 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा

सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबविताना

मोकळ्या जागापार्किंग आदींचे नियोजन करावे

                                             उपमुख्यमंत्री अजित पवार

            ठाणेदि.१६ :- सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना पुढील 25 वर्षांचा विचार करून नियोजन करावे. वाहनांसाठी पुरेसे पार्किंगमैदानेबागा यांच्यासाठी खुल्या जागा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईलयाकडे लक्ष द्यावे. सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे देतानाच त्यांची देखभाल सुद्धा त्यांना परवडली पाहिजेयाचा विचार करावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

            बेलापूरमधील सिडकोच्या मुख्यालयात आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडखासदार सुनील तटकरेमाजी मंत्री शशिकांत शिंदेविभागीय आयुक्त विलास पाटीलठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरसिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जीनवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंहनवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

            सिडकोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळनवी मुंबई मेट्रो प्रकल्पसुमारे 1 लाख 4 हजार घरांचा गृहनिर्माण प्रकल्पखारघर येथील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क आणि नैना प्रकल्प आदी प्रकल्पांच्या सद्यःस्थितीचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी आढावा घेतला.

            श्री. पवार म्हणाले कीसिडको परिसराचा विकास करत असताना काँक्रिटचे जंगल उभारून चालणार नाही. घरांची निर्मिती करत असताना त्या भागातील मोकळ्या जागा राखल्या जाव्यात. तसेच इमारतीमधील नागरिकांच्या चारचाकी व दुचाकींसाठी पार्किंगची सोय उपलब्ध व्हावी. राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे यापुढील काळात इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यांच्या चार्जिंगची सोयही या ठिकाणी करण्यासंदर्भात प्रकल्पामध्ये नियोजन करण्यात यावे. यासाठी सध्या सुरु असलेल्या प्रकल्प आराखड्यामध्ये काही सुधारणा करता येतील का ते पहावे. तसेच पुढील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये वरील बाबींचा साकल्याने विचार करावा. गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पोलीसशासकीय कर्मचारीमाथाडी कामगार यांनाही घरे मिळावीतयासाठी आरक्षण ठेवण्यासंदर्भात विचार करावाअसे निर्देशही श्री. पवार यांनी यावेळी दिले.

            सिडकोने शहरांचा विकास करत असताना सामान्य जनतेच्या प्रश्नांचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी कमी व्हाव्यातयावर लक्ष द्यावे. मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत असताना पाणी पुरवठ्याचे नियोजन योग्य रितीने व्हायला हवे. त्यासाठी या भागात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करावे. जे प्रश्न सिडकोच्या स्तरावर सोडविता येणे शक्य आहेअसे सर्व प्रश्न नियमांच्या अधीन राहून तातडीने सोडविण्यासाठी पावले उचलावीत. राज्य शासनस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती मदत करण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

 

            गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी ठाणे-कळवा मार्गावरील वाहतूक कोंडीसिडकोच्या हद्दीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील चटई क्षेत्राची (एफएसआय) समस्या आदी समस्या यावेळी मांडल्या. खासदार श्री. तटकरे यांनी नैना प्रकल्प तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या यावेळी मांडल्या.

Featured post

Lakshvedhi