Sunday, 19 September 2021

 राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उद्घाटन

सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा: राज्यपाल

 

            मुंबई दि :12,मुंबई विद्यापीठाने गणेशोत्सव सुरु असतानाच आपल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा श्रीगणेशा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राने पर्यावरणस्नेही परिसर अशी वेगळी ओळख निर्माण करावी व आदर्श शैक्षणिक परिसर होण्यासाठी प्रयत्न करावेअशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. 

            राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्घाटन झालेत्यावेळी ते बोलत होते. ठाणे व रत्नागिरीनंतर विद्यापीठाचे सिंधुदुर्ग हे तिसरे उपकेंद्र आहे.

उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतखासदार विनायक राऊतआमदार दिपक केसरकरकुलगुरू डॉ सुहास पेडणेकरप्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णीकुलसचिव बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत व कुलगुरू सुहास पेडणेकर दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी विद्यापीठातील तसेच देशविदेशातील तज्ज्ञ व प्राध्यापकांना सिंधुदुर्ग परिसर येथे निमंत्रित करावे व तेथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे. कालांतराने सिंधुदुर्ग उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजेअशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग येथे उपकेंद्र सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उपकेंद्राला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

00000

 

Governor inaugurates Sindhudurg Sub Centre of University of Mumbai

 

 Mumbai date 12 :Governor of Maharashtra and Chancellor of the Universities Bhagat Singh Koshyari inaugurated the Sindhudurg Sub Centre of the University of Mumbai through online mode on Sunday (१२ Sept). This is the third subcentre of the University, the two others being Thane and Ratnagiri.

        Minister of Higher and Technical Education Uday Samant, Member of Parliament Vinayak Raut, MLA Deepak Kesarkar, Vice Chancellor Dr Suhas Pednekar, Pro VC Ravindra Kulkarni, Registrar Baliram Gaikwad were prominent among those present.

00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi