नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांमधील त्रुटी दूर करून
ग्रामस्थांना मालमत्ता पत्रक वाटप करावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २७ : नवी मुंबईतील नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया) क्षेत्रातील गावांच्या नगर रचना योजनांना तातडीने मंजुरी द्यावी. तसेच मंजूर असलेल्या योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता कार्डांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिडको-नैना अंतर्गत गावांच्या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांच्यासह सिडकोचे व्यस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment