वृत्त क्र. 2718
'उमेद'च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व
१ कोटी लखपती दीदी संकल्प अभियान
· २०२६ ते २०२९ या कालावधीत राज्यभर अभियान
मुंबई, दि. 27 : ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्राम विकास विभागाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ‘महिला बचत गट नोंदणी मोहीम व १ कोटी लखपती दीदी संकल्प अभियान’ राबविण्याचा शासन निर्णय १७ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केला आहे. सन २०२६ ते २०२९ या कालावधीत हे अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती 'उमेद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment