Wednesday, 1 July 2026

शासकीय वसाहतींमधील इमारतींची मागणीनुसार दुरुस्ती

 शासकीय वसाहतींमधील इमारतींची मागणीनुसार दुरुस्ती

    राज्यमंत्री इंद्रनील नाईक

 

मुंबई, दि. ३० - मुंबईतील वांद्रे, वरळी, घाटकोपर, मालाड, गोरेगाव आणि मरोळ येथील शासकीय वसाहतींमधील निवासी इमारतींची दुरुस्ती उपलब्ध निधी आणि प्राप्त मागण्यांनुसार नियमितपणे करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत नियम २९३ अंतर्गत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिली.

राज्यमंत्री नाईक म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वसाहतींमधील घरांच्या दुरुस्तीच्या मागण्या प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तरतूद करून कामे हाती घेतली जातात. उपलब्ध निधीनुसार नियोजन करून देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येतात.

वांद्रे येथील शासकीय वसाहतीत दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी पात्रता निकष निश्चित करण्यासाठी तसेच संबंधित बाबींवर निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय १४ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आला असून समितीचे कामकाज सध्या प्रगतीपथावर असल्याची माहितीही राज्यमंत्री नाईक यांनी दिली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi