रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास यांच्यात सामंजस्य करार
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास यांच्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उद्योग-संबंधित कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला या अंतर्गत ऑनलाइन शिक्षण, प्रमाणपत्र, इंटर्नशिप आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. 'व्हर्टिव्ह' या कंपनीच्या सीएसआर निधीतून एक मोफत कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला जात आहे. महाराष्ट्रातील १५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षत करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या शाखेतील २०२६ या वर्षा मध्ये उत्तीर्ण झालेले आणि २०२७ मध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यी यांचा यामध्ये समावेश असेल. डेटा सेंटर ऑपरेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट.,क्रिटिकल पॉवर आणि कूलिंग सिस्टीम्स,भौतिक सुरक्षा प्रणाली,ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स पद्धती व उद्योग मानके या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल.या प्रशिक्षणांमुळे डेटा सेंटर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळतील
No comments:
Post a Comment