Saturday, 18 July 2026

भारत टेक्स’च्या धर्तीवर महाराष्ट्र सदनात वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्री

 भारत टेक्सच्या धर्तीवर महाराष्ट्र सदनात वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्री

·         दिल्लीकरांना पारंपरिक वस्त्रांची पर्वणी

 

नवी दिल्ली, दि. १७ :नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स २०२६च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित (महाटेक्स) आणि येथील महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी  मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेले हे तीन दिवसीय  प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi