पनवेलच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय
-मंत्री उदय सामंत
शिलार धरण प्रकल्पासह विविध विकासकामांना गती
मुंबई, दि. 09 : पनवेल शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक असून, शिलार धरण प्रकल्पासह विविध पाणीपुरवठा योजनांना गती देण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य विक्रांत पाटील यांनी म.वि.प. नियम 97 अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती.
मंत्री उदय सामंत म्हणाले, पनवेल महापालिकेला दररोज 268 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सध्या 204 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे 64 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी 493 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, या योजनेतून 90 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या या योजनेतून 57 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे.
No comments:
Post a Comment