मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १४ : मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी. पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती" करीता अर्ज मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवंन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, २ फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतीत आपल्या पुर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), मुंबई गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर २७ जुलै, २०२६ पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment