पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ४३.६० किमी अंतराच्या या प्रकल्पामुळे २५ ते ३० टक्के वाहतूक कमी होणार आहे. यामुळे सर्व मेट्रोमार्गिका जोडल्या जाणार असून रस्त्याची वाहतूक क्षमता वाढणार आहे. त्यामुळे एचसीएमटीआर या प्रकल्पाचे काम लवकर सुरू करुन २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. यासाठीचे आर्थिक मॉडेल तयार करून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment