Tuesday, 14 July 2026

महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक संमत होणे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण

 महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक संमत होणे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

 

मुंबई, दि. ७ : अधिवेशनात विधानपरिषदेत देखील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६' एकमताने मंजूर करण्यात आले हे विधेयक महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

 

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६वर विधानपरिषद सभागृहात ३ तास ३३ मिनिटे सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत अनेक सदस्यांनी सहभाग नोंदवून सूचना व मते मांडली. त्यानंतर हे विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले.

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi