Tuesday, 7 July 2026

अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या

 अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या

-         मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

            मुंबई, दि. ६ : अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विविध गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील २३ गावांना पाण्याचे स्त्रोत जवळ नसल्याने १५ किमीवरून पाणी आणावे लागते. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनमधील प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

            मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अमगोथू रंगानायक, उपसचिव मंत्रा मानकामे, मजिप्राचे अधीक्षक अभियंता अजय सिंह, मजिप्राचे अमरावतीचे अधीक्षक अभियंता संतोष गव्हाणकर, कार्यकारी अभियंता विवेक सोळंके, अमरावती जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता स्नेहा धावडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तर अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

            मंत्री पाटील यांनी सांगितले की, चिखलदऱ्याच्या ग्रामीण भागातील ३६ गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा होतो, ही गंभीर बाब आहे. मजिप्रा, जलजीवन मिशन योजना निधीअभावी रखडू देवू नका. दुर्गम भागातील पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्या. मेळघाटातील योजना आदिवासी आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेवून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. अचलपूर आणि

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi