अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज
एकात्मिक मदत आराखड्यास तातडीने मंजुरी देण्यात येईल. यापूर्वी कोल्हापूर येथील महापूराच्या वेळी अशी मदत देण्यात आली होती. नुकसानग्रस्त घरे, दुकाने यांचे नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करावेत. रस्ते व इतर पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. तात्काळ व दीर्घकालीन मदतीच्या उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. या कामांसाठी आवश्यक निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालघरमधील मदत आणि पुनर्वसन कार्यात केंद्र शासन व राज्य शासनाचे विविध विभाग सहभागी असून या सर्व विभागांची संयुक्त आढावा बैठकही लवकरच घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment