Monday, 20 July 2026

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा

 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

•       उद्योग विभाग आढावा बैठक

•       रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रासाठी धोरणे आणावीत

 

मुंबई, दि. १७: देशामध्ये राज्यात सर्वाधिक गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीचे रूपांतर उद्योगांमध्ये करण्यासाठी गुंतवणूकक्षम आणि रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी सर्वंकष धोरणे आणावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून या क्षेत्राची उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करण्याचेही सूचित केले.

 

            राज्याच्या उद्योग विश्वाच्या वाढीसाठी धोरण तयार करताना संबंधित क्षेत्रातील तज्ञ, यशस्वी उद्योजक यांच्याशी चर्चा करावी. संबंधित उद्योग क्षेत्रात असलेली कमतरता या धोरणातून दूर होईल याचा प्रयत्न करण्यात यावा. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या विविध उद्योग विषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी,  यामुळे संपन्न महाराष्ट्राची निर्मिती होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi