गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪ मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार
मुंबई, दि. २७ : पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित पुनर्वसन, वनीकरण आणि उभारणीसाठी संबंधित कामांना गती देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गारगाई जलसिंचन प्रकल्प आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन मंत्री गणेश नाईक, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव एकनाथ डवले यासह वन विभाग आणि नगर विकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment