Wednesday, 29 July 2026

ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

 ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा


रुग्णालयाच्या वीज जोडणीचे काम 'फास्टट्रॅक'वर करण्याचे


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुंबई, दि. २८: ठाणे आणि लगतच्या पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठाणे येथील ९०० खाटांचे अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे कामकाज अत्यंत वेगाने आणि 'फास्टट्रॅक' पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.


उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीत ठाणे सिव्हील हॉस्पिटलच्या सद्यस्थितीचा आणि आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, संजय राठोड, प्रताप सरनाईक यांच्यासह उपमुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यावेळी उपस्थित होते.


प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यातील कामांची गती वाढवत असतानाच प्रशासकीय पातळीवर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी यावेळी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सां

गितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi