Tuesday, 7 July 2026

वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेवून त्यानुसार पाण्याचे नियोजन आणि कार्यक्षम वापर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात दिवसेंदिवस नवीन वसाहती वाढत आहेत.वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेवून त्यानुसार पाण्याचे नियोजन आणि कार्यक्षम वापर झाला नाही, तर भविष्यात गंभीर जलसंकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर आणि दीर्घकालीन नियोजन करणे ही काळाची गरज आहे. पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील गरज लक्षात घेवून पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प हा शहरासाठी खूप महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी तयार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाकडून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत यामध्ये दिरंगाई करू नये असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi