राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद
ते म्हणाले की, केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन राज्याचे स्वतंत्र क्वांटम मिशन राबवत असून, प्रशिक्षित प्राध्यापकांच्या माध्यमातून राज्यात मजबूत क्वांटम इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील टप्प्यात ५०० प्रशिक्षक आणि त्यानंतर किमान ५ हजारांहून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
क्वांटम तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय, अवकाश, उद्योग, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांत मोठी क्रांती होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढील काही वर्षात रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आजपासूनच सक्षम करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment