Friday, 10 July 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' माहितीपटाचा प्रीमियर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

'पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' माहितीपटाचा प्रीमियर

 

मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनी संयुक्तपणे निर्मित 'पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'प्रीमियर शो ' झाला.

 

या ' प्रीमियर शो'साठी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले,उपसंचालक वर्षा आंधळे, आदी उपस्थित होते.

 

हा माहितीपट पंढरपूर वारीची प्रत्यक्ष अनुभूती देतो. या चित्रपटागृहामध्ये जणू काही पंढरपूरची वारी प्रत्यक्षात उतरली असल्याचेही अनुभव येत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi