विदर्भातील विकास अनुशेष पुन्हा निर्माण होऊ देणार नाही
– राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
मुंबई, दि. १ : विदर्भाच्या विकासाचा अनुशेष पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी शासन कटिबद्ध असून विधानसभेत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली.
सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेवरील मुद्द्यांना उत्तर देताना राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की, वैधानिक विकास महामंडळ स्थापन होईपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात नवीन विकास अनुशेष निर्माण होणार नाही, याची शासन दक्षता घेण्यात येईल. विभागनिहाय अर्थसंकल्पीय तरतुदींसह प्रत्यक्ष खर्चाची आकडेवारी नियमितपणे सभागृहासमोर सादर करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, वैधानिक विकास महामंडळ हे केवळ विदर्भासाठी नसून विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील मागास भागांना न्याय देण्यासाठी आहे. महाराष्ट्राचा समतोल विकास करणे ही शासनाची जबाबदारी असून कोणताही भाग विकासापासून वंचित राहणार नाही.
No comments:
Post a Comment