सेवाभावाची प्रेरणादायी कहाणी
प्राथमिक आरोग्य केंद्र डाब येथील अधिपरिचारिका चमेली भताने या गेल्या नऊ वर्षांपासून मुख्यालयी वास्तव्यास राहून रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. त्यांनी आतापर्यंत ९८५ संस्थात्मक प्रसूती यशस्वीपणे हाताळल्या असून प्रसूती सेवा, आपत्कालीन सेवा आणि रुग्णसेवेमध्ये त्यांचे योगदान विशेष आहे. दुर्गम भागातील महिलांना सुरक्षित मातृत्वाचा आधार देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
No comments:
Post a Comment