आदिवासी भागातील आरोग्य सेवेचे प्रभावी नेतृत्व
धडगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांतीलाल शिवाजी पावरा हे मागील २३ वर्षांपासून आदिवासी व अतिदुर्गम भागात सेवा बजावत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली धडगाव तालुक्यात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढले असून माता मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. मानव विकास अभियान, १०२ रुग्णवाहिका सेवा, आशा स्वयंसेविकांचे सक्षमीकरण आणि उच्च जोखमीच्या गर्भवतींचे प्रभावी व्यवस्थापन यामुळे माता-बाल आरोग्य सेवांना बळकटी मिळाली आहे.
कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी मोहिमेत उद्दिष्टाच्या २०० टक्क्यांहून अधिक कामगिरी करून धडगाव तालुक्याने राज्यात अग्रक्रम मिळविला आहे.
No comments:
Post a Comment