Thursday, 18 June 2026

रस्ते दुर्गम असले तरी सेवेचा मार्ग सुकर

 रस्ते दुर्गम असले तरी सेवेचा मार्ग सुकर"

प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल नायका यांनी गेल्या पाच वर्षांत माता मृत्यूदर कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यात त्यांना यश आले असून मागील दोन वर्षांत त्यांच्या कार्यक्षेत्रात एकही माता मृत्यू होऊ दिलेला नाही. दुर्गम भागातील नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास दृढ करण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi