Tuesday, 23 June 2026

छत्रपती संभाजीनगरातील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत १० कोटी रुपये देण्यात येणार

 छत्रपती संभाजीनगरातील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी

महानगरपालिकेमार्फत १० कोटी रुपये देण्यात येणार

-मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २३ : छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तर सदस्य अनिल परब, अंबादास दानवे, चित्रा वाघ यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. त्यास उत्तर देताना सामंत बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi