Thursday, 18 June 2026

दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा

 दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, दुर्गम भागात सेवा देणारे आरोग्य कर्मचारी हे आरोग्य व्यवस्थेचे खरे आधारस्तंभ आहेत. अनेक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित साधनसामग्री असूनही ते नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवत आहेत. त्यांचे कार्य केवळ प्रशंसनीय नाही तर संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी प्रेरणादायी आहे. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

या सन्मानामुळे नंदुरबारसह राज्यातील दुर्गम भागात कार्यरत हजारो आरोग्य अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका आणि समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांना नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi