नर्मदेच्या लाटांवर आरोग्य सेवेची जीवनदायिनी
धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीकाठच्या दुर्गम वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या तरंगत्या दवाखान्याच्या आरोग्य सेविका अंजना परमार यांचे कार्य विशेष प्रेरणादायी आहे. रस्ते नसलेल्या आणि अनेकदा केवळ जलमार्गानेच पोहोचता येणाऱ्या गावांमध्ये त्या बोट अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून नियमित आरोग्य सेवा पोहोचवितात.
गर्भवती माता, नवजात बालके, लसीकरणासाठी पात्र बालके, सिकलसेल रुग्ण आणि वृद्ध नागरिक यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करीत आहेत. पावसाळ्यात नदीला पूर आलेला असतानाही जीव धोक्यात घालून दुर्गम वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणी, औषध वितरण, समुपदेशन आणि रेफरल सेवा देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. अनेक गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी स्थलांतरित करून जीव वाचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे
No comments:
Post a Comment