Monday, 15 June 2026

कृषि पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देण्याबाबत कार्यवाही करू

 कृषि पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देण्याबाबत कार्यवाही करू

-         कृ‍षि मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ९ : कृषि पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, कृषि  विद्यापीठ व उच्च तंत्रशिक्षण विभागाचे अभिप्राय घेवून योग्य तो निर्णय सर्वानुमते घेण्यात येईल असे कृषि मंत्री दतात्रय भरणे यांनी सांगितले.

           मंत्रालयातील दालनात राज्यातील कृषि पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देण्याबाबत कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी या बैठकीला सचिव परिमल सिंह, उपसिचव प्रतिभा पाटील, कोल्हापूर जिल्ह्यातील कृषि तंत्रनिकेतन पदविका संस्था, संस्थापक, प्राचार्य संघटनांचे सदस्य, कृषि शिक्षण व संशोधन परिषद, चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, अधिष्ठाते, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

      मंत्री भरणे म्हणाले की, राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमार्फत चालविण्यात येणाऱ्या कृषि पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जा देणे,अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता वाढविणे, कृषि पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा दिल्यास मिळणारे लाभ याचा अभ्यास करावा. कृषि विभागाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi