Saturday, 13 June 2026

पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

 पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख

 

मुंबई, दि.१२ : राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वर्षा निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सादरीकरण  झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi