Saturday, 27 June 2026

राज्यातील मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना देणे

 मंत्री नितेश राणे म्हणाले की, राज्यातील मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि अंतर्गत जलाशयांमधील मत्स्य उत्पादन क्षमता वाढविणे हे विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध तलावांचा प्रभावी वापर करून कोळंबी पालनाला प्रोत्साहन दिल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आर्थिक बळकटी मिळेल.

 

सध्या विभागाकडे गोड्या पाण्यातील कोळंबी बीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र योजना नसली तरी नाविन्यपूर्ण योजनांतर्गत जिल्हा नियोजन समिती अथवा जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान योजनांमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या पर्यायांचा विचार करता येऊ शकतो.

 

राज्य शासन मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मत्स्य उत्पादन वाढ, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ उपलब्धता यांसोबतच कोळंबी पालनासारख्या उच्च मूल्याच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील हा उपक्रम यशस्वी झाल्यास विदर्भातील इतर जिल्ह्यांसाठीही तो आदर्श मॉडेल ठरू शकतो, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi