मंत्री तटकरे म्हणाल्या की, श्रीवर्धनचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. कणघर परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी येथे बायोडायव्हर्सिटी झोन विकसित करण्यात यावा. या परिसरात निलगिरी वूड पिजन, मलबार पॅराकीट, मलबार ग्रे हॉर्नबिल, व्हाईट-चीक्ड बार्बेट आणि पर्पल-रम्प्ड सनबर्ड यांसारख्या विविध पक्षी प्रजाती आढळतात. या पक्ष्यांविषयीची माहिती पर्यटक आणि पक्षीप्रेमींपर्यंत पोहोचावी यासाठी पक्षी निरीक्षण केंद्र उभारण्यात यावे. तसेच परिसरात वॉक-वे आणि पाथ-वे विकसित करण्यासाठी प्राथमिक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment