Saturday, 20 June 2026

म्हसळा-श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्पांना गती

 म्हसळा-श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्पांना गती

मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. १८: श्रीवर्धन मतदारसंघाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कणघर ता. म्हसळा येथे बायोडायव्हर्सिटी झोन विकसित करण्यात यावा. त्यासाठी सुमारे २० एकर जागा निश्चित करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

 

म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस रायगड जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) किसन जावळे, महाडचे कार्यकारी अभियंता कांबळे, जिल्हा वनसंरक्षक जाधव, उपअभियंता सोनिया महिल, रोहा विभागाचे वन अधिकारी स्वप्नील चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संतोष रोकडे, संतोष जाधव तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi