कोळसा वायूकरणामुळे ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर भारताची वाटचाल वेगवान होईल
– केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे
ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोळसा व लिग्नाईट वायूकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यासाठी ३७ हजार ५०० कोटी रुपयांची ऐतिहासिक प्रोत्साहन योजना मंजूर केली असल्याची माहिती केंद्रीय कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी दिली.
केंद्रीय कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे म्हणाले की, २०३० पर्यंत १०० दशलक्ष टन कोळसा वायूकरणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून मिथेनॉल, अमोनिया, युरिया आणि इतर रसायनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात या क्षेत्राला दिलेल्या पाठबळाचे कौतुक करत त्यांनी देशातील पहिला मोठा कोळसा वायूकरण प्रकल्प महाराष्ट्रात सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
No comments:
Post a Comment