Thursday, 18 June 2026

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या रुग्णांचे स्वागत ‘वेलकम किट’ ने

 महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या रुग्णांचे स्वागत ‘वेलकम किट’ ने करावे

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि. १७  : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य  योजनेंतर्गत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या वेलकम किटने प्रत्येक रुग्णाचे स्वागत  करण्यात यावे तसेच आरोग्यमित्र आणि रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना आवश्यक ती मदत, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात राज्यातील अंगीकृत रुग्णालयांची बैठक आरोग्य भवन, मुंबई येथे आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. .

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi