मुंबई क्लायमेंट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
•दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार
मुंबई, दि. १५ : हवामान बदलाच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या पहिल्या पर्वाच्या परिणाम आणि प्रभाव अहवालाचे (‘आउटकम अँड इम्पॅक्ट रिपोर्ट’) प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आले. मुंबई क्लायमेंट वीकच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन २२ ते २६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान मुंबईत करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात असून, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे यजमान संस्थांमध्ये सहभागी आहेत.
No comments:
Post a Comment