कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राच्या ‘क्लायमेट फायनान्स ॲक्सेस अँड मोबिलायझेशन स्ट्रॅटेजी’ची घोषणा करण्यात आली. तसेच ‘क्लायमेट प्रोजेक्ट प्रिपरेशन फॅसिलिटी’ (पीपीएफ) या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ४४ अमृत शहरांतील एक हजारांहून अधिक हवामान कृती प्रकल्पांची रूपरेषा तयार करण्यात आली.
‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’मध्ये १०० हून अधिक हवामान उपाययोजनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. उष्णतेशी मुकाबला करणाऱ्या उपाययोजना, सौर ऊर्जा, पुनरुत्पादक शेती, कचऱ्याचे पुनर्वापर तंत्र, शहरी जंगल, कूल रूफ्स, हवामान अर्थसंकल्प यांसारख्या संकल्पनांना विशेष प्रतिसाद मिळाला.
‘मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये ग्लोबल साऊथमधील ३५० हून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला. ऊर्जा, पाणी, शेती, कचरा व्यवस्थापन आणि हवामान डेटा या क्षेत्रांतील ३४ अंतिम स्पर्धकांमधून आठ विजेते निवडण्यात आले. या उपक्रमात माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment