Thursday, 21 May 2026

एआय, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत देशात महाराष्ट्र आघाडीवर

  

एआय, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत

देशात महाराष्ट्र आघाडीवर

- माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

टेक महाइम्पॅक्ट २०२६परिषद

 

मुंबई दि.२० : महाराष्ट्रात कृषीपासून नागरिक सेवा वितरणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे परिवर्तन होत असून राज्य शासन एआय, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी काम करत आहे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

तंत्रज्ञान, नवोपक्रम, डिजिटल गव्हर्नन्स व सीएसआर विषयक उच्चस्तरीय टेक महाइम्पॅक्ट २०२६परिषदेत बोलत होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाला तंत्रज्ञानाची सखोल जाण असून सार्वजनिक हित, रोजगारनिर्मिती आणि उद्योगांच्या वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. राज्य शासनाने ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) साठी स्पष्ट धोरण आखले असून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अनेक व्यवसाय प्रक्रिया आता भारतात स्थलांतरित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi