पाच लाख घरकुलांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. 8 हजार 368 कोटी रुपयांच्या निधी उपलब्धतेचा आदेश केंद्रीय मंत्री चौहान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रदान केला. महाअवास अभियान गौरव गाथा, महाआवास त्रैमासिक या पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये महाआवान अभियान 2023-2024 : राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात प्रथम- कोकण, द्वितीय- नाशिक, तृतीय- नागपूर हे विभाग ठरले. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम- नागपूर, द्वितीय- अमरावती, तृतीय- नाशिक हे विभाग ठरले.
No comments:
Post a Comment