Wednesday, 20 May 2026

कामावरून कमी केलेल्या माथाडी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे

  

कामावरून कमी केलेल्या माथाडी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे

कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

 

मुंबई, दि. २० : मे. न्यूदाई अभियांत्रिकी प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. लि., आय.पी. २७ निमगाव इंडस्ट्रियल एरिया, खेड (ता. खेड, जि. पुणे) या कंपनीतील नोंदणीकृत ०८ माथाडी कामगारांना  गुड बिहेव्हिअर बॉण्ड’  घेऊन पुन्हा सेवेत घेण्यात यावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

 

 कामावर घेण्याबाबतच्या प्रश्नांवर कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील वादावर तोडगा काढताना हा निर्णय घेण्यात आला. नरिमन भवन येथे ही बैठक घेण्यात आली.  दुरदृश्य प्रणालीद्वारे आमदार सुरेश धस व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्यक्ष बैठकीस कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदी उपस्थित होते.

 

दरम्यान, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा सचिव अशोक निकम यांच्याकडून कोरस इंडस्ट्रीज लि., एमआयडीसी धाटाव, (ता. रोहा, जि. रायगड) येथे पूर्वसूचना न देता सेवेतून कमी केल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. या प्रकरणातही गुड बिहेव्हिअर बॉण्डच्या अटीवर कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्देश कामगार मंत्री यांनी दिला.

 

या प्रकरणाबाबत संबंधित दोन्ही कंपन्यांना कामगारांचे हित लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi