महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय (क्र. 202605131138212501) कृषी विभागाने जारी केला आहे.
देशी गायींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, सुधारणा आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने पुणे येथील कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या केंद्राच्या बळकटीकरणालाही यापूर्वी शासनाने मान्यता दिली होती.
No comments:
Post a Comment